पुणे : दुकानात असलेल्या अल्पवयीन मुलीला तंबाखू (Demand to Tobacco) मागून तंबाखूची पुडी देताना तिचा हात पकडून विनयभंग केल्याचा (Molestation of Girl) प्रकार समोर आला आहे. तर, मुलगी वडिलांबरोबर गाडीवरून जात असताना तिच्या कमरेला हात लावून छेडछाड केली असल्याचेही तक्रारीत (Pune Crime) म्हटले आहे.
याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात अमेश नाईक (20, रा. इंदिरानगर खड्डा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने तक्रार दिली आहे. स्वारगेट परिसरात मुलीच्या वडिलांचे किरणा दुकान आहे. ती दुकानात बसलेली होती. त्यादरम्यान, आरोपी नाईक दुकानात आले व त्याने तंबाखूची पुडी मागितली. ती देताना तिचा हात पकडला. त्यानंतर एकेदिवशी तरुणीला पीडितेच्या आई-वडीलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
पुण्यात घडताहेत अनेक गुन्हे
गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात विविध गुन्हे घडत आहेत. यामध्ये खून, बलात्कार, खुनाचा प्रयत्न, दरोडा यांसारख्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यानंतर आता अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला आहे.