हायकोर्टाने आंदोलकांना सुनावले (फोटो- टीम नवराष्ट्र)
हायकोर्टाने मराठा आंदोलकांना सुनावले
हायकोर्टात जरांगे पाटलांच्या आंदोलनाविरुद्ध हायकोर्टात सुनावणी
राज्य सरकारनेपावले उचलावीत असे कोर्टाचे म्हणणे
Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरुद्ध मुंबई हायकोर्टात तातडीची सुनावणी सुरू आहे. यावेळी हाटीकोर्टाने आंदोलकान देखील सुनावले आहे. दरम्यान राज्य सरकार, याचिकाकर्ते आणि आंदोलनाच्या बाजूने बाजू मांडणारे विधीतज्ञ हायकोर्टात हजर आहेत. या प्रकरणात तातडीने हायकोर्टात सुनावणी सुरू आहे.
मुंबई हायकोर्टाचे निरीक्षण काय?
मुंबईत सुरू असलेले आंदोलन हाताबाहेर गेले आहे. पावसाची शक्यता असताना तुम्ही मुंबईत आलात. पावसात आंदोलन करता तर चिखलात बसण्याची तयारी ठेवा. मुंबईकरांना नाहक त्रास होता कामा नये. तुम्ही आंदोलनासाठी देण्यात आलेल्या नियमांचे पालन करणार का? असा सवाल हायकोर्टाने आंदोलकांच्या वकिलांना विचारणा केली आहे. 5 हजारांपेक्षा जास्त असलेल्या आंदोलकांनी परत जावे असे पत्रक तुम्ही काढणार का? असा सवाल देखील हायकोर्टाने विचारला आहे.
मुंबईत कोणालाही येऊ देऊ नका. ठाण्यातच रोखावे. आंदोलनाच्या विरोधात पण नियमांचे पालन करावे. सरकारने जबाबदाऱ्या
पूर्ण कराव्यात. शौचालये, पथदिवे, खाण्याची दुकाने बंद होती. आंदोलकांवर जरांगे पाटलांचेही नियंत्रण नाही. सर्व पूर्ववत करण्यासाठी आंदोलकांना 2 दिवसांचा अवधी हायकोर्टाने दिला आहे.
जरांगे पाटलांच्या आंदोलनाविरुद्ध तातडीची सुनावणी
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरुद्ध मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आले आहे. या याचिकेवर आज हायकोर्टात तातडीची सुनावणी सुरू आहे. आज हायकोर्टाला सुट्टी असून देखील या प्रकरणावर तातडीने सुनावणी सुरू आहे. यावेळो हायकोर्टाने सरकारला अनेक प्रश्न विचारले आहेत.
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील आहेत तरी कोण?
महाधिवक्ता कोर्टात काय म्हणाले?
हायकोर्टाच्या आदेशांचे मनोज जरांगे पाटलांकडून उल्लंघन झाले आहे. आंदोलकांचे उद्देश अजून स्पष्ट होत नाहीये. आंदोलन अनिश्चित काळासाठी सुरू राहू शकत नाही. व्हीडिओद्वारे धमकावण्यात येत आहेत. असेच सुरू राहिले तर कायद्याचे राज्य राहू शकत नाही. या आंदोलनामुळे मुंबई खोळंबली आहे. जरांगे पाटील यांनी आंदोलनाचे नियम पाळले नाहीत. सर्व नियमांचे पालन करण्याची हमी जरांगे पाटील यांनी दिली होती. मात्र आंदोलकांनी नियमांचे पालन केले नाही. पोलिस संयम बाळगून आहेत, बळाचा वापर केलेला नाही. तुम्ही निर्देश द्यावेत, त्याप्रमाणे आम्ही कारवाई करू.