मंगल प्रभात लोढांचे आदित्य ठाकरे यांच्या निराधार आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर (फोटो सौजन्य-X)
Mangal Prabhat Lodha on Aaditya Thackeray : मुंबईत रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत ९ हजार झाडांची वृक्षतोड करण्याचा डाव फसला आहे. उद्धव ठाकरेंच्या पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी बेकायदेशीरपणे झाडं पाडण्याच्या प्रयत्न असलेल्या एका जेबीसीवरील दोन व्यक्तींना हे कृत करताना रंगेहाथ पकडले आहे. या प्रकरणावरून आता राजकार तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सदर प्रकरणामध्ये भाजपाचे आमदार मंगल प्रभात लोढा असल्याचा गंभीर आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. मात्र आता या प्रकरणावरून मंगल प्रभात लोढा यांनी आदित्य ठाकरेंच्या निराधार आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आले.
एक वर्षापूर्वी मुंबईतील कुर्ला पश्चिम येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत म्हणजेच आयटीआय परिसरात मियावकी पद्धतीने लावलेली ९ हजार झाडे लावण्यात आली होती. जी मध्यरात्री तोडली जाणार होती. यासाठी दोन व्यक्ती जेसीबीसहीत पोहचलेही होते. या व्यक्तींना संरक्षक भिंत तोडून झाडे जमीनदोस्त करायला सुरुवात केली. मात्र तोपर्यंत शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी मनिष मोरजकर यांच्या नेतृत्वात अनेक शिवसैनिक त्या ठीकाणी पोहचले. झाडे तोडण्याच्या तयारीत असलेल्या दोघांनाही पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणानंतर मुंबई महापालिकेच्या गार्डन विभागाच्या अधिकाऱ्यांनीही पोलिसांत याविषयी तक्रार दाखल केलीय. आयटीआय परिसरातील 9 हजार झाडांचे अर्बन फॉरेस्ट तोडण्यामागे त्यांचा नेमका काय उद्देश होता हे समोर आले नसले तरी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी एक्स वर पोस्ट करत यामागे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढांचा हात असल्याचा आरोप केला आहे. स्विमिंग पूल बांधण्यासाठी हिंदूस्थान पेट्रोलियमच्या सीएसआर फंडातून लावण्यात आलेली झाडे तोडून त्याठिकाणी स्विमिंग पूल बांधणार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
महाराणा प्रताप शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कुर्ला येथे गेल्या २ महिन्यांपासून शिवकालीन पारंपारिक खेळांचे मैदान विकसित करण्याचे काम सुरू आहे.
त्या मैदानाचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असे देण्यात आले असून येत्या १३ ऑगस्ट रोजी म्हणजेच अहिल्यादेवी होळकर यांच्या… pic.twitter.com/Nk9H3iwjCu
— Mangal Prabhat Lodha (@MPLodha) July 8, 2025
यावेळी मंगल प्रभात लोढा यांनी आदित्य ठाकरे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना म्हटलं की, “महाराणा प्रताप शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कुर्ला येथे गेल्या २ महिन्यांपासून शिवकालीन पारंपारिक खेळांचे मैदान विकसित करण्याचे काम सुरू आहे. त्या मैदानाचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असे देण्यात आले असून येत्या १३ ऑगस्ट रोजी म्हणजेच अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य देशी आणि पारंपारिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याचे ठरले आहे. ITI च्या विद्यार्थ्यांना अडथळा न होता खेळाडूंना या मैदानाचा लाभ घेता यावा यासाठी मागच्या बाजूला पायवाटेसाठी एक स्वतंत्र दार बनवण्याचे काम काल सुरू होते, ज्यामुळे बाहेरच्या बाजूला अवैधरित्या वाढणाऱ्या रोहिंग्या- बांगलादेशी वस्तीतील झोपड्यांना अडथळा येईल, ही भीती आपणास असावी! मुंबईत प्रथमच निर्माण होणाऱ्या मराठमोळ्या अशा देशी खेळांच्या मैदानाचे स्वागत केले पाहिजे, परंतु त्या ऐवजी रोहिंग्या- बांगलादेशींना वाचवण्यासाठी केविलवाणा प्रयत्न तर होत नाही ना… हे तपासून पाहावे!” असं सडेतोड प्रत्युत्तर मंगल प्रभात लोढा यांनी आदित्य ठाकरे यांना दिले आहेत.