विधानभवन परिसरात भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य (फोटो सौजन्य-X)
Mumbai Fire News in Marathi : आज विधानभवन परिसरात मोठी आगीची घटना घडली. आग गेटजवळ लागली आणि त्यामुळे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि वाहने तात्काळ घटनास्थळी पोहोचली आणि आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या परिसरात घनदाट जंगले आहेत आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
आज विधानसभेत काही महत्त्वाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आमदार उपस्थित होते. कार्यक्रमानंतर आमदारांच्या जेवणाची व्यवस्था येथे केली होती. म्हणूनच सर्व आमदार जेवणासाठी मार्गस्थ झाले होते. याचदरम्यान अचानक परिसरात धुराचं साम्राज्य बघायलं मिळालं. याचवेळी विधान परिसरात बाहेरच्या दिशेला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आले, त्यावेळी त्यांनी माध्यमांना सांगितलं नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, विधिमंडळ भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या स्कॅनिंग मशीनमध्ये शॉर्ट सर्किट झाला. यामुळे तिथून धूर निघायला लागला. हा धूर सर्वत्र पसरायला लागला. त्यामुळे तातडीने प्रशासन अलर्ट झालं. प्रशासनाकडून सर्वोतोपरी काळजी घेण्यात आली. या परिसरातील धूर बंद व्हावा यासाठी उपायोजन करण्यात आल्या. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी रवाना करण्यात आल्या.
यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही या घटनेची माहिती माध्यमांना दिली. “विधान भवनाच्या स्वागत कक्षात जिथे स्कॅनिंग मशीन आहे तिथे छोटीशी आग लागली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ती आग लागली आहे. ती आटोक्यात आणण्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्याही येथे आहेत. आग विझवण्यात आली आहे. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. प्राथमिक माहितीनुसार, स्कॅनिंग मशीनमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आहे. सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत. आता अग्निशामक दलाच्या गाड्या येऊन तपासणी करणार आहेत”, अशी प्रतिक्रिया राहुल नार्वेकर यांनी दिली.