मुंबई : ईडीच्या कोठडीत असलेले अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, त्यांच्या प्रकृतीबाबत ईडी खासगी डॉक्टर किंवा एम्सच्या तज्ज्ञांचा सल्ला घेण्याच्या तयारीत आहे. दुसरीकडे, त्यांचा मुलगा फराज याला या आठवड्यात चौकशीसाठी बोलावण्यात येऊ शकते. अशी माहिती समोर येत आहे.
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, त्याचे कुटुंबीय आणि टोळीतील सदस्यांशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने यांच्यावर बुधवारी अटकेची कारवाई केली. त्यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. मात्र, अटकेनंतर दोन दिवसांनीच त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे. येथील उपचार आणखीन काही दिवस सुरु राहणार असल्याचे समजते. त्यामुळे ईडी लवकरच त्यांच्या प्रकृतीबाबत खासगी डॉक्टर किंवा एम्सच्या तज्ज्ञांचा सल्ला घेणार आहे.
[read_also content=”दाऊद इब्राहिमचा उजवा हात इकबाल मिरची कडून भाजपला दहा कोटी रूपये पक्षनिधी : राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार अनिल गोटेचा खळबळजनक आरोप https://www.navarashtra.com/maharashtra/dawood-ibrahims-right-hand-iqbal-mirchi-gives-bjp-rs-10-crore-party-fund-ncp-state-vice-president-anil-gotes-sensational-allegation-nrvb-246412.html”]