• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Cji India Bhushan Gavai Attend Government Law College About Dr Babasaheb Ambedkar

Mumbai News: “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्व व्यासंगी व बहुआयामी होते”; CJI भूषण गवई

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य केले त्या ठिकाणी गौरव होणे व शासकीय विधी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असल्याचा सार्थ अभिमानाचे असल्याचेही श्री गवई यांनी नमूद केले.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 05, 2025 | 08:23 PM
Mumbai News: “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्व व्यासंगी व बहुआयामी होते”; CJI भूषण गवई

सरन्यायाधीश भूषण गवई (फोटो- ani)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई: विविध विषयांचे अभ्यासक व तज्ञ असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्त्व विधीज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्रज्ञ असे बहुआयामी होते. शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अध्यापन कारकीर्दही मोलाची आणि प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले.

शासकीय विधी महाविद्यालय येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्राध्यापक आणि प्राचार्य, कारकीर्दीला 90 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त स्मृतीपटलाचे अनावरण आणि सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण आर. गवई यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे, न्यायमूर्ती मनिष पितळे, महाधिवक्ता बिरेंद्र सराफ व प्राचार्या डॉ.अस्मिता वैद्य हे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर व जीवनावर आधारित चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. शासकीय विधी महाविद्यालयाच्या वतीने मानपत्र देऊन सरन्यायाधीश भूषण गवई यांचा गौरव करण्यात आला. विविध संस्था तसेच मान्यवरांनीही यावेळी सरन्यायाधीश गवई यांचा गौरव केला.

सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्व व्यासंगी व बहुआयामी होते. ते एक उत्कृष्ट शिक्षक असल्याने त्यांच्या विविध क्षेत्रातील योगदानाबरोबरच त्यांची अध्यापन कारकीर्दही प्रेरणादायी ठरली. शासकीय विधी महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य करीत असतानाच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील दुर्बल घटकांवरील अन्यायाला वाचा फोडण्याचे कार्य सुरू केले. 1935 च्या गव्हर्मेंट ऑफ इंडिया या अॅक्टमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान मोलाचे ठरले.

शासकीय विधी महाविद्यालयाला देदीप्यमान शैक्षणिक वारसा लाभला असून अनेक विधीज्ञ या महाविद्यालयातून घडले. महाविद्यालयाच्या विविध समित्यांचे वैशिष्ट्यपूर्ण कार्यही अभिनंदनीय आणि अनुकरणीय असल्याचे गौरवोद्गार श्री गवई यांनी काढले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य केले त्या ठिकाणी गौरव होणे व शासकीय विधी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असल्याचा सार्थ अभिमानाचे असल्याचेही श्री गवई यांनी नमूद केले. प्राचार्य अस्मिता वैद्य प्रास्ताविकात म्हणाल्या, शासकीय विधी महाविद्यालयाला देदीप्यमान शैक्षणिक वारसा लाभला असून अनेक नामवंत विधीज्ञ या महाविद्यालयाने घडविले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून 1935 मध्ये अध्यापन कारकीर्दीस सुरुवात केली. न्यायशास्त्रासारख्या अत्यंत गहन विषयाचे अध्यापन डॉ आंबेडकर करीत असत. या महान कार्याला 90 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या गौरवार्थ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विधी सेवा क्षेत्रात महाविद्यालयाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचेही वैद्य यांनी सांगितले.

या कार्यक्रमास सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती हेमंत गोखले, न्यायाधीश रेवती ढेरे, न्यायाधीश नीला गोखले, कुलगुरू डॉ. दिलीप उके, कुलगुरू डॉ हेमलता बागला, कुलगुरू डॉ अपूर्वा पालकर, कुलगुरू डॉ गोसावी, प्रधान सचिव सुवर्ण केवले, सिनियर कौन्सेल र‍फिक दादा, बार कौन्सिल अध्यक्ष विठ्ठल कोंडे-देशमुख, प्रिन्सेस आशाराणी गायकवाड व मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Cji india bhushan gavai attend government law college about dr babasaheb ambedkar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2025 | 08:23 PM

Topics:  

  • Bhushan Gawai
  • Dr. Babasaheb Ambedkar
  • Mumbai News

संबंधित बातम्या

संतापजनक! सरन्यायाधीश भूषण गवईंवर बुटाने केलेल्या हल्ल्याचे भाजप नेत्याकडून कौतुक; वाद पेटणार?
1

संतापजनक! सरन्यायाधीश भूषण गवईंवर बुटाने केलेल्या हल्ल्याचे भाजप नेत्याकडून कौतुक; वाद पेटणार?

45 दिवसांच्या आत ई-चालान भरा, अन्यथा…; रस्ते वाहतूक मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2

45 दिवसांच्या आत ई-चालान भरा, अन्यथा…; रस्ते वाहतूक मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

RVG Educational Foundation चा वार्षिक दिन सोहळा थाटामाटात संपन्न
3

RVG Educational Foundation चा वार्षिक दिन सोहळा थाटामाटात संपन्न

वेगावर नियंत्रणासाठी आणखी गतिरोधक? BMCचा विचार – वाहतूक विभागाशी चर्चा सुरू
4

वेगावर नियंत्रणासाठी आणखी गतिरोधक? BMCचा विचार – वाहतूक विभागाशी चर्चा सुरू

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Bhushan Gavai attack: हल्ला करणाऱ्या मनुवादी…; भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी कोल्हापूरकर आक्रमक

Bhushan Gavai attack: हल्ला करणाऱ्या मनुवादी…; भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी कोल्हापूरकर आक्रमक

Kalyan News : ‘अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी कल्याणकर खंबीरपणे उभे…’, माजी आमदाराकडून 17 लाखांची आर्थिक मदत

Kalyan News : ‘अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी कल्याणकर खंबीरपणे उभे…’, माजी आमदाराकडून 17 लाखांची आर्थिक मदत

विद्यार्थ्यांना दिलासा! परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय, शैक्षणिक मदतीसाठी पुढे यावे; चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

विद्यार्थ्यांना दिलासा! परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय, शैक्षणिक मदतीसाठी पुढे यावे; चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

ICC Ranking : मिया मॅजिकची आता ICC ला भुरळ! कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत सिराजने गाठली मोठी ऊंची  

ICC Ranking : मिया मॅजिकची आता ICC ला भुरळ! कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत सिराजने गाठली मोठी ऊंची  

वेळीच सावध व्हा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?

वेळीच सावध व्हा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?

डिजिटल आत्मनिर्भरता! Amit Shah यांनी Google आणि Microsoft केला राम राम, निवडला ‘हा’ भारतीय प्लॅटफॉर्म

डिजिटल आत्मनिर्भरता! Amit Shah यांनी Google आणि Microsoft केला राम राम, निवडला ‘हा’ भारतीय प्लॅटफॉर्म

Gautami Patil New Song: ‘सुंदरा’ व ‘कृष्ण मुरारी’ नंतर गौतमी पाटीलच्या ‘सोनचाफा’ गाण्याला भरभरून प्रेम

Gautami Patil New Song: ‘सुंदरा’ व ‘कृष्ण मुरारी’ नंतर गौतमी पाटीलच्या ‘सोनचाफा’ गाण्याला भरभरून प्रेम

व्हिडिओ

पुढे बघा
Ambernath :  अंबरनाथ शहरात पसरलेल्या रासायनिक धुरामुळे नागरिकांना त्रास

Ambernath : अंबरनाथ शहरात पसरलेल्या रासायनिक धुरामुळे नागरिकांना त्रास

Raigad : sc आरक्षणावर वाद, निवडणूक अधिकाऱ्यांवर सेटिंगचा आरोप

Raigad : sc आरक्षणावर वाद, निवडणूक अधिकाऱ्यांवर सेटिंगचा आरोप

Reservation : राज्य सरकारने तात्काळ बंजारा समाजाचा अनुसूचित जाती समावेश करण्याची मागणी

Reservation : राज्य सरकारने तात्काळ बंजारा समाजाचा अनुसूचित जाती समावेश करण्याची मागणी

Thane News : सरन्यायाधीश भूषण गवईंवरील अवमानप्रकरणी राष्ट्रवादी-शरद पवार पक्षाचा निषेध

Thane News : सरन्यायाधीश भूषण गवईंवरील अवमानप्रकरणी राष्ट्रवादी-शरद पवार पक्षाचा निषेध

Nagpur News : उद्ध्वस्त शेतकऱ्यांना सरकारची तुटपुंजी मदत – विजय वडेट्टीवार यांची टीका

Nagpur News : उद्ध्वस्त शेतकऱ्यांना सरकारची तुटपुंजी मदत – विजय वडेट्टीवार यांची टीका

Virar : 18 मजली इमारतीतून थेट खाली पडल्याने मृत्यू, हत्या झाल्याचा पालकांचा आरोप

Virar : 18 मजली इमारतीतून थेट खाली पडल्याने मृत्यू, हत्या झाल्याचा पालकांचा आरोप

Prashant Jagtap : न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर बूट फेकल्या प्रकरणी  शरद पवार गटाकडून निषेध

Prashant Jagtap : न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर बूट फेकल्या प्रकरणी शरद पवार गटाकडून निषेध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.