शिवसेना ठाकरे गटाला मोठं खिंडार, महापौरांसह १२ नगरसेवकांचा पक्षाला रामराम
मुंबई : भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस हे आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या नावावर बुधवारी शिक्कामोर्तबही झाले. त्यानंतर आज त्यांच्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. मात्र, मागील सरकारमध्ये मुख्यमंत्री राहिलेले एकनाथ शिंदे त्यांच्या नव्या मंत्रिमंडळात असतील का हे अजून निश्चित झालेले नाही. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे.
हेदेखील वाचा : एकच जल्लोष अन् आनंद! पुन्हा मुख्यमंत्री होणाऱ्या देवेंद्र फडणवीसांवर नेत्यांचा शुभेच्छांचा वर्षाव
विधानसभा निवडणुकीत महायुतीला चांगले यश मिळाले असून, बहुमताचा आकडाही पार केला आहे. त्यानंतर आता नव्या सरकारचा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह एनडीएशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, भाजपच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी फडणवीस यांची निवड झाल्यानंतर बुधवारी महायुतीच्या सर्व पक्षांनी राज्यपाल सी. राधाकृष्णन यांची राजभवनावर भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला आहे. असे जरी असले तरी मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही भूमिका घेणारे एकनाथ शिंदे हे या नव्या सरकारमध्ये असतील की नाही, याची स्पष्टता झालेली नाही.
दरम्यान, अजित पवार यांना एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील सहभागाबाबत पत्रकारांकडून प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर अजित पवार यांनी, ‘शिंदे यांचे माहीत नाही. पण मी शपथ घेणार’ असे म्हणताच एकच हशा पिकला.
…त्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळेल
देवेंद्र फडवणीस यांनी यावर भाष्य केले. ते म्हणाले, ‘मी स्वतः एकनाथ शिंदे यांना भेटून विनंती केली आहे की, शिवसेनेच्या वतीने त्यांनी मंत्रिमंडळात रहावे. शिवसेनेच्या आमदारांचीही इच्छा आहे. त्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी खात्री आहे’, असे फडणवीस म्हणाले.
फडणवीस यांच्या शिफारशीचा मला आनंद : शिंदे
अडीच वर्षांपूर्वी येथेच माझ्या नावाची शिफारस फडणवीस यांनी केली होती. तेथे आज मी त्यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून शिफारस करताना मला आनंद होत आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशी शिफारस आणि पाठिंब्याचे पत्र आज आम्ही दिले आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचा पाठिंबा भाजपला दिला होता. त्यानंतर आता पुन्हा आम्ही भाजपला पाठिंबा देत आहोत.
हेदेखील वाचा : देवेंद्र फडणवीस आज घेणार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ; पंतप्रधान मोदी, अमित शहांसह अनेक बडे नेते राहणार उपस्थित