अन्न व्यवसायिकाविरुद्ध कायदेशीर कारवाईचा इशारा (फोटो- istockphoto)
मुंबई: अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत, अन्न सुरक्षा व मानके (परवाना व नोंदणी) नियमन, २०११ मधील अनुसूची ४ मधील सूचनांनुसार शाकाहारी व मांसाहारी पदार्थाची तयारी, प्रक्रिया, शिजवणे वेगळी असावी. शाकाहारी अन्नपदार्थाची मांसाहारी अन्नपदार्थापासून प्रक्रियात्मक व साठवणीच्या टप्प्यावर स्पष्टपणे वेगळी व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या अन्न सुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या अन्न व्यावसायिकांवर परवाना रद्द, दंड आकारणे किंवा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी कळविले आहे.
सर्व अन्न व्यवसायिकांनी अन्न सुरक्षेबाबत असलेल्या नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. अन्न व औषध प्रशासनामार्फत गतवर्षी राज्यातील ३० हजार अन्न व्यवसायिकांना अन्न सुरक्षेबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. तर या वर्षी एक लाख अन्न व्यवसायिकांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
अन्न सुरक्षा ही केवळ कायदेशीर बाब नसून ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित अत्यंत महत्त्वाची सामाजिक जबाबदारी आहे. नियमांच्या पालनात दोषी अन्न आस्थापनाना त्वरित नोटीस, कारवाई व आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जात असल्याचे त्यांनी कळविले आहे.
अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र आणि भारतीय अन्न व सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (FSSAI) यांच्या संयुक्त विद्यमाने अन्नसुरक्षा व प्रमाणपत्र प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत राज्यभर विविध प्रशिक्षण शिबिरे, कार्यशाळा व जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे. अन्न व औषध प्रशासनात एकूण नवीन १८९ अन्न सुरक्षा अधिकारी ७ जून २०२५ रोजी रुजू झालेले असल्याने अन्न आस्थापना तपासणी संख्या निश्चितच वाढणार आहे. राज्यभरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स व उपाहारगृहांमध्ये नियमित तपासण्या केल्या जात असून तपासणीत दोषी आढळणाऱ्यांवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत कारवाई करण्यात येईल.
अन्न भेसळीसंदर्भात नागरिकांनीही हेल्पलाइन किंवा Food Safety Connect App च्या माध्यमातून तक्रार नोंदवावी. अधिक माहितीसाठी किंवा मार्गदर्शनासाठी आपले नजीकचे अन्न व औषध प्रशासन कार्यालय किंवा https://fda.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी, असेही आयुक्त श्री. नार्वेकर यांनी कळविले आहे.
‘रेडी टू ईट’ पदार्थांनी पोखरतंय शरीर
तुम्ही नियमितपणे रेडी टू ईट अन्नपदार्थ किंवा रेडी टू ईट हीट फूड खाता का? तर ही नक्कीच काळजी करण्यासारखी बाब आहे आणि त्याचं कारण म्हणजे अलिकडच्या एका जागतिक अभ्यासातून असे दिसून आले आहे की अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्न (UPF) खाल्ल्याने अकाली आणि न टाळता येण्याजोगे मृत्यू होण्याचा धोका वाढताना दिसून येत आहे.
रोज तुम्ही मृत्यूला कवटाळताय, ‘रेडी टू ईट’ पदार्थांनी पोखरतंय शरीर; वेळीच व्हा सतर्क
निरोगी वातावरणाला प्रोत्साहन देणाऱ्या नियामक आणि राजकोषीय धोरणांद्वारे समर्थित, UPF चा वापर कमी करण्यासाठी जागतिक कृतीची आवश्यकता या अभ्यासातून बळकटी देते. UPF हे अन्नपदार्थांमधून काढलेल्या किंवा प्रयोगशाळेत संश्लेषित केलेल्या घटकांपासून बनवलेले रेडी टू ईट किंवा रेडी टू हीट इंडस्ट्रियल फॉर्म्युलेशन आहेत, ज्यांच्या संरचनेत संपूर्ण अन्न घटक कमी किंवा अजिबात नसतात, याची सामान्य माणसांना कल्पनाच नाहीये.






