मुंबई : एमआयएमने महाविकास आघाडीत येण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी एमआयएमचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. एमआयएम ही भाजपची बी टीम आहे. त्यामुळे त्यांच्याशी आघाडी करण्याचा प्रश्नच येत नाही, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
शिवसेना खासदार आणि जिल्हाप्रमुखांचं शिवसंपर्क अभियान सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदार आणि जिल्हा प्रमुखांशी आज संवाद साधला. यावेळी त्यांनी एमआयएमसोबत जाणार नसल्याचं स्पष्ट केलं. विरोधकांच्या मतदारसंघात शिवसेना वाढवा. शिवसेनेची (shivsena) ताकद राज्यभर वाढवा, असे आदेश देतानाच शिवसंपर्क अभियानाचं मिशन यशस्वी करूनच या, अशा शुभेच्छाही त्यांनी शिवसेना खासदार आणि जिल्हाप्रमुखांना दिल्या आहेत. तसेच येत्या काळात आपणही महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
[read_also content=”1.5 दशलक्ष युक्रेनियन मुलं विकल्या जाण्याच्या धोका असल्याचा युनिसेफचा दावा! https://www.navarashtra.com/latest-news/russia-ukraine-war/unicef-claims-1-5-million-ukrainian-children-are-at-risk-of-being-sold-nrps-257154.html”]