फोटो सौजन्य: गुगल
कर्जत/संतोष पेरणे : तालुक्यातील ठाकूरवाडीत चिराग फाउंडेशनच्या पुढाकाराने मिंटोक प्रायव्हेट लिमिटेड आणि धवल शहा यांच्या माध्यमातून तेथील शाळा तेथील सार्वजनिक ठिकाणी आणि रहिवाशी यांच्या घरात सौर दिवे लावले जात आहेत.त्यातून हे गाव आता सौर दिव्यांनी उजळून टाकले. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी महत्त्वाचं हे एक महात्त्वाचं पाऊल उचललं जात आहे.
कर्जत तालुक्यातील दुर्गम आणि अवघड क्षेत्रात असणाऱ्या स्टेशन ठाकूरवाडी गावात चिराग रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशन मुंबई यांच्या अथक प्रयत्नांनी वाडीतील जिल्हा परिषदेची शाळा,गावातील प्रत्येक घर, आणि गाव सौर ऊर्जेच्या दिव्यांनी उजळून निघाले आहे. स्टेशन ठाकूरवाडी शाळेला दिलेल्या सोलर पॅनल,एल ई डी, क्रीडा साहित्य,लायब्री याचा उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला. मिंटोक ने दिलेल्या या सर्व वस्तूंचे औपचारिक स्वरूपाचे उद्घाटन आणि कोनशिला अनावरण मिंटोक संस्थापक रमा ताडेपल्ली, खुशाल तलरेजा यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी चिराग रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशन मुंबईच्या संस्थापक संचालक प्रतिभा पाई,ऑपरेशन हेड वृषाली पालवणकर तृप्ती भोसले कम्युनिकेशन मॅनेजर, निखिल सिंह बागल फिल्ड सुपरवायझर, तसेच चिरागचे कार्यकर्ते,खांडपे केंद्राच्या केंद्रप्रमुख उज्ज्वला मोरे, मुख्याध्यापक, शिक्षक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी मिंटोक मार्फत स्टेशन ठाकूर वाडी शाळेला सोलर पॅनल आणि ४५ घरांना होम लाईट,बी एल आर लॉजिस्टिक लिमिटेड मार्फत १५ घरांना लाईट व वॉटर फिल्टर तसेच धवल शहा यांनी ३१ होम लाईट आज ७६ वॉटर फिल्टर,सहा स्ट्रीटलाईट वाटप करण्यात आल्या.असे एकूण गावातील ९८ घरांना होम लाईट व वॉटर फिल्टर वाटप करण्यात आले.शाळा सोलर पॅनल बसवले,एल इ डी टीव्ही तसेच क्रीडा साहित्य आणि वाचनालय साठी पुस्तके दिल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.
ग्रामस्थ माजी सरपंच बीड बुद्रुक किसन कवटे यांनी आमच्या वाडीत पावसाळ्यात पंधरा पंधरा दिवस काळोख राहत असायचा आणि त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष होते. विंचू काटा, साप, हिंस्त्र प्राणी यांची प्रचंड भीती असायची, यात काही लोकांचा पूर्वी जीव सुद्धा गेलेला आहे.परंतु चिराग फाउंडेशनच्या माध्यमातून आता घरटी होम लाईट, आणि वाडीत चौका चौकात सोलर स्ट्रीटलाईट बसविल्यामुळे वाडी उजळून निघाली आहे.