कैद्यांनी घेतलं तब्बल ५१ कोटींचं उत्पन्न; कसं ते जाणून घ्या
मुंबई : राज्यातील विविध कारागृहांत असलेल्या बंदीवानांनी मेहनतीतून कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. विशेषतः यंत्रमाग, हातमाग, शिवणकाम, बेकरी, मोटार सर्व्हिस शेतीतून सर्वाधिक उत्पन्न मिळाल्याने प्रशासनाला अर्थिक फायदा होत आहे. २०२३-२४ वर्षात १३ कोटी रुपयांचे उत्पन्न घेत कैद्यांनी गरुडझेप घेतली आहे. तर चार वर्षात तब्बल ५१ कोटींहून अधिक रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. ज्या कैद्याना सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे, अशांना रोजगार देणे बंधनकारक असते. त्यानुसार शिक्षाधीन कैद्यांपैकी १३०० से १४०० कैद्यांना कारागृह उद्योगात रोजगार दिला जात आहे.
अपर पोलिस महासंचालक सुहास बारके यांच्या नाविण्यपूर्ण उक्रमामुळे कैद्यांना फायदा होत असल्याचे राज्यात ६० कारागृहांमध्ये ९ मध्यवर्ती कारागृहे, ३० जिल्ला २० खुली कारागृहे आणि १ किशोर सुधारालयाचा समावेश आहे. येरवडा, कोल्हापूर, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिकरोड, नागपूर, अमरावती मध्यवर्ती व वेरवडा खुल्या कारागृहांतर्गत ११ विविध प्रकारच्या उद्योगधद्यांतून कैद्यांनी उत्पन्न घेतले आहे.
७६ टक्के नफा
विविध कारागृहांत शिक्षाधीन कैद्यांनी विक्रमी उत्पन्न घेतले आहे. २०२१-२२ मध्ये १ हजार ३० कैद्यांनी कोटी ४० लाखांचे उत्पन्न घेतले आहे. त्यामध्ये ३ कोटी ७ लाखांचा नफा प्रशासनाला मिळाला आहे. २०२२-२३ मध्ये राज्यातील विविध कारागृहांतील ८३० कैद्यांनी ११ कोटी १० लाखांचे विक्रमी उत्पन्न घेतले. त्यामध्ये कारागृह प्रावसनाला ४५ टक्के नफा झाला आहे. २०२३-२४ मध्ये ९८८ कैद्यांनी १८ कोटी उत्पन्न मिळविले आहे. त्यामध्ये किमान ७६ टक्के नफा कारागृह विभागाला आहे.
उत्पन्नवाढीसाठी विशेष प्राधान्य
कारागृह निर्मित वस्तूंच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी प्रशासनाकडून विशेष प्राधान्य देणात आले आहे. विविध कारागृहांतर्गत जॉब वर्क संकल्पना राबविण्यात येत आहे. विशेषतः येरवडा आणि नागपूर मध्यवर्ती कारागृहांत उत्पादनाच्या प्रकल्पाद्वारे कैदी मेहनत करीत आहेत. नाशिक मध्यवर्ती कारागृहातही जॉब वर्क सुरू करण्यात आले आहे. तर कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहांतर्गत मोरॉसिंग सेंटर सुरू करण्यात आले आहे.
कारागृहात कैद्यांना कारखाना, शेती, संकीर्ण, सुरक्षा याठिकाणी रोजगार दिला जातो. त्यांना प्रशिक्षित करून यंत्रमाग, हातमाग, शिवणकामासह सुतारकाम अशा विविध १९ प्रकारच्या उद्योगाद्वारे उत्पन्न घेतले जाते,
-डॉ. जालिंदर सुपेकर, पॉलिस महानिरीक्षक, कारागृह विभाग
कैद्यांच्या हाताला काम मिळावे या दृष्टिकोनातून विविध कारागृहांत आयोगातून उत्पन्न देवले जात आहे. त्यामुळे उत्पन्नात वाढ होत आहे, कैद्यांना नियमानुसार केतनही दिले जात आहे. कारावासाच्या शिक्षेत त्यांना चांगले जीवन जगता यावे, कलेची जोपासना करावी, हाच या मागचा उद्देश आहे.
गुहास करके, अपर महासंचालक महानिरीक्षक, कारागृह सुधारसेवा