पुणे: जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा मंगळवार दि ३ ऑक्टोंबर रोजी शिक्रापूर येथे चाकण चौक या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.
दि ३ऑक्टोंबर रोजी सकाळी ठीक ९ वाजता जगद्गुरु श्रीच्या सिद्ध पादुकांची भव्य मिरवणूक, संत पिठावर आगमन होत आहेत .दरम्यान भाविकांसाठी महाप्रसादचे आयोजन केले आहे. भाविकांनी जगद्गुरु श्रींच्या अमृतवाणीचा पादुका दर्शनाचा व महाप्रसादाचा आयोजन केले असून भाविकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन स्व – स्वरूप संप्रदाय पुणे जिल्हा भक्तसेवा मंडळ च्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी निराधार महिलांना २५ शिलाई मशीन वाटप करण्यात येणार आहे. गुरुपूजन , आरती , प्रवचन , उपासक दीक्षा, दर्शन व पुष्पवृष्टी इत्यादी कार्यक्रम होणार आहे.
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्यावतीने नेहमी लोकपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. यामध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण शैक्षणिक साहित्य वाटप, संस्थांनच्यावतीने ४२ ॲम्बुलन्स महाराष्ट्रभर मोफत सेवा आणि नाणीज येथे २४ तास हॉस्पिटल सेवा सुरू आहे. गोर-गरीब शेतकऱ्यांना मोफत बियाणे खते ,औषधे शेती अवजारे वाटप केली जातात, दुष्काळ पडल्यास संस्थांनच्यावतीने जनावरांना शेकडो टन चारा पूरविला जातो.
अंगारे दोरे धुपारे गंडा यावर विश्वास न ठेवता अध्यात्म विज्ञान व्यवहार यांची सांगड घालून जीवन कसे जगावे याचे मार्गदर्शन केले जाते.
निराधार महिलांना शिलाई मशीन, शेळ्या-मेंढ्या दूभत्या गाई म्हशीचे वाटप केले जाते.अशा प्रकारे अनेक उपक्रम राबविले जातात. यासाठी महाप्रसादचे आयोजन केले आहे. भाविकांनी जगद्गुरु श्रींच्या अमृतवाणीचा पादुका दर्शनाचा व महाप्रसादाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन स्व – स्वरूप संप्रदाय पुणे जिल्हा भक्तसेवा मंडळच्यावतीने करण्यात आले आहे