पुण्यातील गणेशोत्सव 2025 (फोटो- टीम नवराष्ट्र)
हुतात्मा बागू गेनू मंडळाचा देखावा आणि त्यासमोर होत असलेल्या गर्दीला नादब्रह्म ढोलताशा पथकाच्या स्थिर वादनाने खेळवून ठेवले होते. शनिवार पेठेतील जयहिंद मित्र मंडळाने साकारलेला आदिमाया आदिशक्ती साडेतीन शक्तिपीठांचा देखावा पाहण्यासाठी महिला भाविकांची मोठी गर्दी झाली होती. ‘वंदे मातरम्’ राष्ट्रीय गीताला दीडशे वर्षे होत असल्याचे औचित्य साधून साईनाथ मंडळ ट्रस्टने यंदा ‘वंद्य वंदे मातरम्’ हा जिवंत देखावा साकारला. त्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची कहाणी सांगणारे, धार्मिक पौराणिक कथा आणि सामाजिक-राजकीय पटलावर असलेले जिवंत प्रश्न मांडणारे देखावे पाहण्यासाठी विविध गणेश मंडळासमोर लोकांनी रंग लावल्याचे चित्र होते.