सिंहस्थ कुंभमेळ्यात दररोज मिळणार 940 दशलक्ष लिटर पाणी; साधूग्राममध्ये दहा लाख साधू-महंत राहणार?
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून सिंहस्थासाठी येणाऱ्या साधू, महंत व भाविकांसाठी प्रतिमानसी पिण्याचे आणि वापराच्या पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पाण्याचा होणारा वापर लक्षात घेता सिंहस्थात २६० दशलक्ष लिटर पाण्याची प्रतिदिन वाढ होणार असून, या काळात सुमारे ९४० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा प्रतिदिन शहरात केला जाणार आहे.
सध्या शहराला ५२० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यात वार्षिक सरासरी साडेपाच टक्के वाढ धरून सध्या ६८० दशलक्ष लिटर पाणी वितरण होत आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मनपाने रस्ते आणि पाणी पुरवठा या दोन बाबी प्रामुख्याने हाती घेतल्या आहेत. दररोज होणाऱ्या पाणी पुरवठ्यात वाढ करण्याबरोबर जलकुंभांची संख्या वाढवणे, नवीन जलवाहिन्या तसेच जुन्या व जीर्ण झालेल्या वाहिन्या बदलणे, जलशुध्दीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यावर भर दिला आहे.
शहराला सध्या प्रतिदिन ५२० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठ केला जातो. त्यात साडेपाच टक्के वाढ गृहीत धरून ६८० दशलक्ष लिटर प्रतिदिन 520 दशलक्ष लिटर पुरवठा सध्या शहराला केला जातो.
व्यवस्था बळकट करणार
शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था बळकट करण्याचा भाग म्हणून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सद्याच्या ११९ जलकुंभाव्यतिरिक्त सध्या शहरात ३० जलकुंभाची कामे प्रगतीपथावर केली जात आहेत. त्यात सर्वधिक नऊ जलकुंभांची संख्या पंचवटीत आहे. या ३० जलकुंभांची साठवण क्षमता ६० दशलक्ष लिटर इतकी होणार आहे.
२०२७-२८ मध्ये केले जाणार पाण्याचे वितरण
पाण्याचे वितरण २०२७-२८ मध्ये केले जाणार आहे. त्याचबरोबर कुंभमेळ्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या साधुग्राममध्ये सुमारे दहा लाख साधु महंत उपस्थित राहण्याची शक्यता गृहीत धरून १५० दशलक्ष लिटर प्रतिदिन आणि सिंहस्थ पर्वणी व इतर कालावधीत दररोज सुमारे एक कोटी भाविकांची संख्या लक्षात घेता ११० दशलक्ष लिटर पाण्याची मागणी गृहीत धरण्यात आली आहे.
35 हजार कोटींची कामे होणार
प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये पुढील वर्षी होणारा सिंहस्थ कुंभमेळा भव्य व अविस्मरणीय करण्यासाठी ३५ हजार कोटी रुपयांची विविध विकासकामे करण्यात येत आहेत. भाविकांना विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात आले असून, या प्रक्रियेत साधू- महतांचे मार्गदर्शन महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
Ekadashi : एकादशीला ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ मंत्राचा का करावा जप, जाणून घ्या धार्मिक महत्त्व






