जळगावमधील पूरामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची पत्राद्वारे मागणी केली (फोटो - सोशल मीडिया
Jalgoan News: अमळनेर : तालुक्यात अवकाळी व सततच्या पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे तात्काळ करून तातडीने मदत मिळावी अशी मागणी माजी मंत्री आमदार अनिल पाटील यांनी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. गेल्या काही दिवसांपासून अमळनेर विधानसभा मतदार संघात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. अवकाळी आणि सततच्या पावसाने खरीप हंगाम पूर्ण हातचा गेला आहे. आणि थोडेफार जे उत्पन्न येणार होते ते आताच्या अवकाळी पावसाने तोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे.
मतदार संघातील ८१ हजार २१२ हेक्टर लागवडीपैकी ४६ हजार ९४८ हेक्टर उभ्या कापसाचे पीक आणि काढणीला आलेल्या शेतात पडलेल्या २९ हजार ४१२ हेक्टर मका २५४४ हेक्टर ज्वारी ७४७ हेक्टर बाजरी आणि २०० हेकटर सोयाबीन यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शासनाच्या निकषानुसार फक्त उभ्या पिकाचा पंचनामा केला आहे. परंतु विशेष वाच म्हणून सरसकट पंचनामे करून सरसकट मदत करण्यात यावी असेही अनिल पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
माजी आमदारांचे पत्र
माजी आमदार साहेबराव पाटील यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून बांधितांना सवलतसंह सरसकट मदतीची मागणी केली आहे. माजी आमदार साहेबराव पाटील यांनी म्हटले आहे की, “२० ऑक्टोबरच्या शासन निर्णयात नाशिक विभागातील जळगाव जिल्ह्यात अतिवृधी व पूर यांचा कालावधी सप्टेंबर २०२५ असा असून ऑगस्ट २०२५ या कालावधीचा समावेश नाही याचे अवलोकन करावे, असे नमूद केले करून सरसकट मदत करावी,” अशी विनंती केली आहे.
२ हेक्टरऐवजी ३ हेक्टरसाठी मिळावी मदत
जळगाव जिल्ह्यासाठी २ हेक्टर ऐवजी ३ हेक्टरसाठी मदत मिळावी. तसेच अतिवृष्टी वाढत्या तापमानामुळे कपाशीवर लाल्या रोग आणि मर रोग आल्याने खरीप हंगाम वाया गेला आहे. त्यामुळे अमळनेर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकन्यांना सरसकट मदत करण्यात यावी अशी मागणी केली असून निवेदनाचा प्रति उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह जिल्ह्यातील विविध आमदार आणि कृषी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे. प्रामुख्याने कापूस मका, सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे बळीराजा हताश झाला आहे. तरी प्रशासनाने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून शेतक-यांना सरसकट तातडीने मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. निवेदन उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी यांना देण्यात आले. निवेदनावर माजी आमदार डॉ. वी एस पाटील, तालुकाध्यक्ष डी.एम. पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. अशोक पवार शहराध्यक्ष प्रशांत निकम, तालुका युवक अध्यक्ष योगेश शिस्रोदे, किसान सेलचे तालुकाध्यक्ष मनोहर पाटील, महिला तालुकाध्यक्ष योजना पाटील, वासुदेव मामा, शांताराम कोळी, महेंद्र लोहार, मांडल, कृष्णा पाटील, अनिल पाटीत जानवे, संजय मधुकर पवार, हरीश लाड पातोंडा चिंधू वानरडे चामुदेव पाटील, वसंत पाटील गांधली यांच्या सह्या आहेत






