मान्सूनच्या पार्श्वभूमीवर NDRF अलर्ट मोडवर! (Photo Credit- X)
पुणे येथील एनडीआरएफच्या ५व्या बटालियनचे कमांडेंट संतोष बहादूर सिंह यांनी या तैनातीबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “महाराष्ट्र आणि गोवा हे ५व्या वाहिनीचे प्राथमिक कार्यक्षेत्र आहे. संबंधित भागांची भौगोलिक संवेदनशीलता, मागील वर्षांमधील पुराचा अनुभव आणि भारतीय हवामान विभागाचा (IMD) अंदाज या सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास करूनच ही रणनीतिक पूर्वतैनाती करण्यात आली आहे.”
या पूर्वतैनातीमुळे आपत्तीच्या वेळी घटनास्थळी पोहोचण्याच्या वेळेत (Response Time) मोठी बचत होणार आहे, ज्यामुळे बचाव आणि राहत कार्य तातडीने सुरू करता येईल. एनडीआरएफच्या सर्व तुकड्या अत्याधुनिक शोध व बचाव उपकरणे , पूर नियंत्रण साधने आणि प्रशिक्षित जवानांसह सज्ज आहेत.
एनडीआरएफची ही सर्व पथके स्थानिक जिल्हा प्रशासन आणि इतर संबंधित आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांच्या (SDMA) सतत संपर्कात असून त्यांच्यात उत्तम समन्वय राखला जात आहे. कमांडेंट संतोष बहादूर सिंह यांनी नागरिकांना आश्वस्त केले आहे की, नैसर्गिक किंवा मानवनिर्मित, कोणत्याही प्रकारच्या आपत्तीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी एनडीआरएफ पूर्णपणे तयार आहे. वेळेत मदतकार्य पोहोचवून नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी दल सदैव कटिबद्ध आहे.






