मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते अनिल परब (abil parabj) यांचे वांद्रे पूर्व येथील कथित बेकायदेशीर कार्यालय पाडण्यात आले आहे. हे कार्यालय पाडल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा फैरी झाडणं सुरू झाला आहे. याविषयी बोलताना भाजपचे आमदार नितेश राणे यांची जीभ घसरली असून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. नितेश राणे हे डोंबिवलीत आले हाेते. या ठिकाणी भाजपाच्या (bjp) वतीने कबड्डी (Kabbadi) स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी त्यांनी पत्रकाराची संवाद साधताना परब आणि ठाकरेंवर टीका केली.
[read_also content=”माथाडी कामगारांचा आज राज्यव्यापी संप; मुंबईतील पाचही मार्केट बंद, कोटींची उलाढाल थांबली https://www.navarashtra.com/maharashtra/state-wide-strike-of-mathadi-workers-today-all-five-markets-in-mumbai-closed-nrps-366265.html”]
भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी खालच्या पातळीवर जाऊन त्यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना नितेश राणे यांची जीभ घसरली असल्याचे दिसून आले. नितेश राणे यांनी त्यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे नामर्द असल्याची टीका करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी अनिल परब यांच्या बांद्र्यातील कार्यालयावर झालेल्या कारवाईवरून ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी अनिल परब यांच्यावरही निशाणा साधला आहे. अनिल परब हा मातोश्रीच्या कारकून असल्याची हल्लाबोल त्यांनी केला आहे. तर अनिल परब यांचे घर तर फक्त झाकी असून मातोश्री टू बाकी आहे असा इशाराही नितेश राणे यांनी अनिल परब यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात केला आहे.तर आमदार अनिल परब यांनी सुक्या धमक्या देवू नये आमच्या घरात येवून धिंगाणा घालणे इतके सोपे नाही. ही काही मातोश्री नाही अशी टीका त्यांनी त्यांच्यावर केली आहे. नितेश राणे यांनी अनिल परब यांच्यावर टीका करताना त्यांनी वेळ आणि तारीख कळवावी आम्ही त्यांचे असे स्वागत करू की पुन्हा राणे साहेब यांच्या घरच्या इथे फिरणार नाहीत असा खणखणीत टोला त्यांनी त्यांना लगावला आहे. तसेच राणे साहेबांच्या घरावर तक्रार करण्याअगोदर उद्धव ठाकरे नावाचा तुझा बाप आहे त्या बापाच्या घराच्या इथे बघ पुढे काय होते असा इशारा त्यांनी त्यांना दिला आहे. अनिल परबचे घर तर फक्त झाकी अजून मातोश्री टू बाकी आहे. दुसऱ्या मातोश्रीवर जेव्हा हातोडा पडेल तेव्हा दिसेल त्याच्यात पण खूप काही अनधिकृत अशा गोष्टी आहेत. असेही ते म्हणाले.