पुणे : मला अचानक आलेला जेपी नड्डांच्या पीएचा फोन आणि मंत्रिपदाची शपथ घ्यायचीये, हे सर्व स्वप्नवत होते. आणि मोठे दडपण वाढले होते. अशी कबुली मिश्कील कबुली केंद्रीय राज्य सहकार मंत्री तथा नागरी उड्डयण मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात दिली. पुणे श्रमिक पत्रकार संघात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत वार्तालाप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर आणि सरचिटणीस सुकृत मोकाशी यांनी त्यांचे स्वागत केले.
विमानतळावर आलेले कार्यकर्ते पाहून आलेली भावना व्यक्त करताना मुरलीधर मोहोळ यांनी, या हजार दोन हजारांमधला मी एक कार्यकर्ता, एकेकाळी मोठ्या नेत्यांची वाट पाहणारा मी, येथे अनेक कार्यकर्ते माझ्या प्रतीक्षेसाठी जमलेले आहेत. हे पाहून मन भारावून गेल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
अगदी सामान्य कार्यकर्ता ते नगरसेवकापासून सुरू झालेला राजकीय प्रवास, त्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष, मग महापौर त्यानंतर थेट खासदार आणि आता केंद्रीय मंत्री असा सर्व प्रवास झरकन डोळ्याखालून गेल्याची कबुली विमानतळावर पोहचल्यानंतर कार्यकर्त्यांची गर्दी पाहून आल्याचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
सहकारातून समृद्धीकडे हा मंत्र सहकाराचा असल्याचे मत मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले. सहकाराच्या माध्यमातून राज्यात मोठे जाळे आहे. ते अधिकाधिक सक्षम केले तर शेवटच्या घटकापर्यंत हा विकास पोहचवला तर सामान्य माणूस समृद्ध होईल, म्हणजेच शेतकरी समृद्ध होईल. त्यामुळे सहकारात मला काम करण्यासारखे खूप आहे, ते मी करीत राहणार आहे.