पुणे : प्रवासी म्हणून ओला कारमध्ये बसलेल्या दोघांनी चालकाचा मोबाईल घेऊन पोबारा केल्याची घटना घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात रामदास पाटील (वय २४, रा. वाकड) यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार, दोन अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. रामदासने ओला कंपनीला कार लावली आहे. ते स्वत: कार चालवितात. कोंढव्यातून दोघेजन कात्रजसाठी बसले होते. त्यांनी कात्रजला कार आल्यानंतर उतरत असताना त्यांचा मोबाईल चोरून तेथून पळ काढला. पुढील तपास पोलीस करत आहेत.