राजगुरूनगर : जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर असलेल्या पाईट येथील १९ कोटी ७९ लाख रुपये खर्चाच्या नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन सरपंच मंगल भांगे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आदींच्या हस्ते करण्यात आले.
ही योजना मंजूर करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरून आमदार दिलीप मोहिते पाटील आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला होता. तसेच शासकीय अधिकारी पंचायत समिती खेड, जिल्हा परिषद पुणे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पुणे व माजी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पत्रव्यवहार करण्यात आला होता.
[blockquote content=”सरपंच या नात्याने ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता पाईट नळ पाणी पुरवठा योजनेचे गावा बाहेरील काही लोकांनी परस्पर नियोजन केल्याचे समजले होते. मी आदिवासी समाजाची महिला असल्याने मला डावलण्यात आले. हा माझ्यावर अन्याय आहे. या गोष्टीचा मी निषेध व्यक्त करते. पाईट नळ पाणी पुरवठा योजनेचे कुठलाही राजकीय पक्षाचा हस्तक्षेप न ठेवता मी स्वत: व सर्व नागरिक मिळून गाव पातळीवर या योजनेचे भूमिपूजन केले.” pic=”” name=”- मंगल भांगे, सरपंच, पाईट.”]