संग्रहित फोटो
अमरावती : देशाबरोबरच जिल्ह्यात १५ ऑगस्ट (August 15 ) रोजी स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव (75th Amrit Mahotsav of Independence) साजरा होत आहे. अमरावतीतही अमृत महोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. अशातच दहशतवादी संघटनेने दिल्लीत बॉम्बस्फोट हल्ल्याची धमकी (Bomb attack threat in Delhi) दिल्यामुळे देशभरातील पोलिस यंत्रणा अलर्ट (Police system alert )आहे. त्यातच दहशतवादी संघटनेने उदयपूरसह अमरावतीमधील कोल्हे हत्याकांडाचाही (kolhe murder case in Amravati) उल्लेख केला आहे. त्यामुळे अमरावतीमध्ये दहशतवादी किंवा अन्य गुन्हेगारी कारवाया होण्याची शक्यता पाहता केंद्रीय गृहविभागाकडून (Central Home Department) अमरावती जिल्हा पोलीस प्रशासनाला सतर्क करण्यात आले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे.
भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या स्मरणार्थ २०२२ चा स्वातंत्र्यदिन अमृत महोत्सव म्हणून साजरा केला जाईल. अमरावतीसह देशभरात १३ ऑगस्टपासून अमृत महोत्सवाला सुरुवात होणार आहे. १५ ऑगस्टपर्यंत विविध कार्यक्रम होणार आहेत. त्यामुळे तीन दिवस हाय अलर्टवर (Three days on high alert) राहणार आहे. तीन दिवस पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. शहरातील १० तर ग्रामीण भागातील ३४ पोलीस ठाण्यांमध्ये पोलीस २४ तास सतर्क राहणार आहेत. बंदोबस्ताबाबत अतिरिक्त पोलिस बंदोबस्ताचीही मदत घेतली जाणार आहे.
विशेष पोलीस उपमहानिरीक्षक, पोलीस आयुक्त आणि पाच जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक यांनी बंदोबस्ताचे नियोजन केले असून, त्यांनी अधिनस्त यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. पोलीस बंदोबस्तातील प्रत्येक घडामोडी व माहिती क्षणोक्षणी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्यावी लागणार आहे. तसेच जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त हे सुध्दा परिस्थितीतील लक्ष ठेवणार आहे. सर्व उच्च अधिकारी बंदोबस्तात तैनात असतील.
संवेदनशील परिस्थितीमुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रत्येक घडामोडीवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. तीन दिवसीय अमृत महोत्सवासाठी शहर व ग्रामीण भागातील सर्व उड्डाण पूल, रेल्वे स्थानक, बसस्थानक, शासकीय कार्यालये, क्रीडा संकुल, शाळा, धार्मिक स्थळे, सिनेमा हॉल, मॉल्सची तपासणी करावी लागणार आहे. त्यासाठी विशेष शाखा विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि क्यूआरटी यांच्यासह डॉग स्कॉड, बीडीएस टीम, ईटीसी आणि विशेषत: गोपनीय विभागानेही चौकशी सुरू केली आहे.
नुपूर शर्माच्या पोस्टला (Posts by Nupur Sharma) समर्थन दिल्यामुळे उमेश कोल्हेंची हत्या (Murder of Umesh Kolhe) करण्यात आली. तसेच अनेकांना धमक्या सुध्दा देण्यात आल्या. या प्रकरणाच्या अनुषंगाने दोन्ही समाजातील काही नेते आणि अधिकारी चर्चेत आले आहेत. अलीकडेच खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana ) यांनीही सावध राहण्याचा इशारा दिला आहे. दुसरीकडे काही नेत्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्य आणि आरोपांबाबतही अडचणी नाकारता येत नाहीत. त्यामुळे बड्या नेत्यांवर आणि महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांची विशेष नजर राहणार आहे.