मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी मला लोकसभा निवडणुकीत पाठिंबा द्याला हवा होता. ते आमचे समाजाचे नेते आहेत. बाळासाहेब आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत. आम्हीदेखील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे पाईक आहोत. बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून आम्ही काम करत आहोत. माझे पक्षातील आणि मुंबईतील काम पहा, हे काम पाहून तरी बाळासाहेब आंबेडकर यांनी मला पाठिंबा द्याला हवा होता. परंतु दुर्दैवाने तस झालं नाही असे विधान खासदार वर्षा गायकवाड यांनी केले.
बाळासाहेब आंबेडकर यांनी समाजाच्या हितासाठी, राष्ट्राच्या हितासाठी आणि संविधानासाठी एकत्र लढलं पाहिजे, असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.