'फुले' चित्रपटाला लावलेली कात्री काढली नाही तर...' ; प्रकाश आंबेडकरांचा सेन्सॉर बोर्डाला इशारा
प्रतीक गांधी आणि पत्रलेखा यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘फुले’ चित्रपटातील काही दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला आहे. त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर आधारित हा चित्रपट वादात सापडला आहे. सेन्सॉर बोर्डाच्या या निर्णयावर सर्वच स्तरातून तिव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनीही संताप व्यक्त केला असून चित्रपटाला लावलेली कात्री काढली नाही तर सेन्सॉर बोर्डाच्या कार्यालयासमोर आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
Raju Shetti: “… याप्रकरणी संबंधितांवर तातडीने कारवाई करावी”; राजू शेट्टींची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
महात्मा फुले यांच्या कार्याबाबत असलेल्या चित्रपटातील काही सीन काढण्याचे आदेश दिले आहेत. महात्मा फुले यांचे वाड्मय प्रकाशित करण्यात आले आहेत. शासनाशी आम्ही सहमत नाही. वाड्मयाचा दिल्लीतून युक्तिवाद केला जात आहे. महाराष्ट्र सरकारने विचार स्वीकारला असेल तर सेन्सॉर बोर्डाला कुठला अधिकार आला.सेन्सॉर बोर्डचा निषेध आम्ही करतो. सेन्सॉर बोर्ड चित्रपटात असणारे सीन समग्र वाड्मयातील आहेत. त्यामुळे सेन्सॉर बोर्ड ने लावलेली कात्री काढली नाही तर सेन्सॉर बोर्डाच्या ऑफिसवर आंदोलन करू. मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे की एका बाजूला अभिवादन करता आणि दुसऱ्या बाजूला चित्रपटाला विरोध करत असाल तर विरोधाभास नको. चित्रपट जसा आहे तसा दाखवला पाहिजे, नाहीतर सेन्सर बोर्डाच्या कार्यालयावर धावा घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.
“मुलींनी बापाचा खून करायला पाहिजे”, ‘त्या’ घटनेवर अभिनेत्री अलका कुबल कडाडल्या…
महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील फुलेवाड्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अॅड. प्रकाश आंबेडकर उपस्थित होते. कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना फुले चित्रपटाबाबत सेन्सॉर बोर्डाने घेतलेल्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. सेन्सॉर बोर्डावर अनेक मान्यवर आहेत. ते चित्रपटांमधून समाजावर काय परिणाम होईल याची तपारणी करतात. पण संविधानाने भारतातील प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे. त्यामुळे चित्रपटातून तेढ निर्णाण होणार नाही, हे पाहण्याची गरज आहे. तसंच सेन्सॉर बोर्डाने घेतलेल्या निर्णयाला विरोध करण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे जर सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला लावलेली कात्री काढली नाही तर बोर्डाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.