मराठी भाषेबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर प्रकाश सुर्वेंचा जाहीर माफीनामा
Prakash Surve Statements: गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठी विरूद्ध हिंदी अशी वादाची ठिणगी पडली होती. त्यावळी काही नेत्यांनी मराठी विरूद्ध उत्तर भारतीय असेही चित्र तयार करण्याचा प्रयत्न केला. या सगळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांचं एक वादग्रस्त विधानाने नव्या वादाची ठिगणी पडली. त्यांच्या या विधानाने वाद निर्माण झाला असता प्रकाश सुर्वे यांनी माफी मागितली आहे.
बोगस मतदारांविरोधात कारवाईसाठी 27 दिवसांचे आधी धरणे आंदोलन; आता बेमुदत उपोषण
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी असा वाद उफाळण्याची चिन्हे दिसत आहेत. महायुतीने उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले असतानाच शिवसेना (शिंदे गट) आमदार प्रकाश सुर्वे यांच्या वक्तव्याने नव्या राजकीय चर्चांना तोंड फुटले आहे.
एका कार्यक्रमात बोलताना सुर्वे म्हणाले, “मराठी माझी आई आहे, तर उत्तर भारत माझी मावशी. आई मेली तरी चालेल, पण मावशी मरायला नको, कारण मावशी जास्त प्रेम करते. आईपेक्षा जास्त प्रेम तुम्ही दिले आहे. हे प्रेम असंच ठेवा,” असे त्यांनी सांगितले. या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर सुर्वे यांच्या विधानावर जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांनी त्यांच्या वक्तव्यावर टीका करत “मराठी अस्मितेचा अपमान” असा आरोप केला आहे, तर सुर्वे समर्थकांनी त्यांचे वक्तव्य “राजकीय संदर्भात घेतले पाहिजे” असे सांगितले.
आमदार सुर्वे यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर राजकारण चांगलेच तापले आहे. मनसे नेत्यांसह विरोधी महाविकास आघाडीनेही प्रकाश सुर्वे यांच्यावर टीका केली. त्यानंतर प्रकाश सुर्वे यांना उपरती झली आणि त्यांनी माफी मागितली. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासोबत त्यांनी एक पत्रकार परिषद घेत त्यांनी जाहीर माफी मागितली.
सुर्वे म्हणाले, मराठी आमची मायमाऊली आहे. अनावधानाने माझ्या तोंडातून तसे शब्द निघून गेले. त्यासाठी मी हात जोडून माफी मागतो. कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. उदय सामंत यांनीदेखील त्यांच्या तोंडून चुकीने तसे शब्द निघून गेले, असल्याचे स्पष्ट केले. पण मनसे नेत अमित ठाकरे मात्र चांगलेच संतापले होते.
अमित ठाकरे म्हणाले, “‘माय मरो, मावशी जगो’ हे वक्तव्य अतिशय लाजिरवाणं आणि लाचार आहे. ‘माय’ म्हणजे महाराष्ट्र आणि ‘मावशी’ म्हणजे उत्तर प्रदेश. अशा प्रकारे बोलणे एका आमदाराला शोभणारे नाही. माफी मागून काही होणार नाही, कारण माफ करणं हे माझ्या हातात नाही, तर मराठी माणसांच्या हातात आहे. निवडणुकीतच त्यांना याचे उत्तर मिळेल. आमच्या पक्षातील कोणाकडून असं वक्तव्य झालं असतं, तरी आम्ही त्याचाही निषेध केला असता, प्रकाश सुर्वे यांनी केलेली चूक गंभीर आहे आणि अशी चूक पुन्हा होऊ नये, हीच आमची अपेक्षा आहे.” असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या वक्तव्यानंतर मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय केंद्रस्थानी आला असून, मुंबईतील आगामी स्थानिक निवडणुकीत या विषयावर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
“मराठी माझी आई आहे पण उत्तर भारतीय माझी मावशी आहे… माय मेली तरी चालेल पण उत्तर भारतीय मावशी मरता कामा नये.. कारण मावशी माझ्यावर जास्त प्रेम करते.. ” हे विधान आहे शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांचं… वा सुर्वे तुम्ही तुमच्या मराठी द्वेषावर चांगला ‘प्रकाश’… pic.twitter.com/zGMGys3FZ4 — MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) November 3, 2025






