भाज्या महागल्या (फोटो सौजन्य - iStock)
पुणेः पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात रविवारी फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत घटल्याने काही भाज्यांचे दर वाढले. विशेषतः भेंडी, गवार, काकडी, वांगी, गाजर, घेवडा आणि भुईमूग शेंग यांच्या भावात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली, तर मटारचे दर घसरले. हिरवी मिरची मात्र स्वस्त झाली असून, इतर भाज्यांचे दर तुलनेने स्थिर राहिले.
रविवारी (दि. ९) गुलटेकडी मार्केट्याडांत राज्य व परराज्यांतून सुमारे ८५ ते ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. कर्नाटक, उत्तरप्रदेश, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून हिरवी मिरची, कोबी, शेवगा, घेवडा आणि भुईमूग शेंग यांचा समावेश होता. इंदोर, राजस्थान आणि जयपूर येथून गाजर, मध्यप्रदेश व हिमाचल प्रदेशातून मटार, तर तामिळनाडूहून तोतापुरी कैरी आली. स्थानिक भागांतून भेंडी, गवार, टोमॅटो, ढोबळी मिरची, आले, गाजर
लग्नसराईमुळे फुलांच्या दरात आली स्थिरता
लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने कट फ्लॉवरला चांगली मागणी कायम आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत फुलांचे दर स्थिर आहेत, अशी माहिती फुलव्यापारी सागर भोसले यांनी दिली आणि कांदा यांची मोठ्या प्रमाणात आवक झाली. मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी सांगितले की, “परराज्यांमधून काही माल कमी प्रमाणात आल्याने पुरवठा घटला आणि परिणामी काही भाज्यांच्या दरात वाढ झाली.”
एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांचे दर कडाडले, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडलं
फुलांचे प्रतिकिलो/जुडी दर
यामध्ये झेंडू: १२०-६०, गुलछडी: २४०-८०, अस्टरः ११०-२० (जुडी), सुट्टा १३०-६०, शेवंती: २५०-१२०, गुलाब (गड्डी) ११०-२०, डच गुलाब (२० नग): ११००-२००, जर्बेराः १३०-५०, कार्नेशियनः ११५०-२५० लिलियम (१० काड्या): २८००-१०००, ऑर्चिडः १३००-४००, ग्लॅडिओ (१० काड्या): २६०-१२०, चमेली १८०० असा दर आकारला जात आहे.
फळभाज्यांचे दर (१० किलो)
कांदाः ११००-१५०, बटाटाः ११५०-२२०, लसूणः १३५०-८००, आले (सातारी): २३००-५००, भेंडीः १४००-७००, गवारः १९००-१२००, टोमॅटोः ११४०-१८०, काकडीः १३००-३५०, वांगीः १४००-७००, ढोबळी मिरचीः १५००-५५०, घेवडाः १५००-७००, गाजरः १३००-५००, भुईमूग शेंगः १७००, मटार (स्थानिक): ११०००-१३००, शेवगाः १७०० ८००, लसूणः १३५०-८००, टोमॅटोः ११४०-१८० इतर सर्व भाज्यांचे दर तुलनेने स्थिर राहिले.
पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव
कोथिंबीरः ११५००-२५००, मेथीः ११२००-१८००, पालकः ११५००-४०००, कांदापातः ११०००-२०००, शेपूः ११०००-१५००, चाकवत, करडई, पुदिना, अंबाडी, चुका, राजगिराः १५००-१०००, मुळाः ११०००-२०००
पालेभाज्यांच्या भावात झाली वाढ
आवक घटल्याने पालेभाज्यांच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. रविवारी मार्केटयार्डात कोथिंबीर सुमारे १ लाख जुडी, तर मेथी ५० हजार जुडी आली. मागणी वाढल्यामुळे भावांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे आता सामान्यांच्या खिशाला अजून त्रास होणार आहे हे मात्र नक्की.
या आहेत जगातील सर्वात महागड्या भाज्या; 1 किलोची किंमत सोन्याहूनही अधिक






