फोटो - सोशल मीडिया
मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. मात्र त्यांच्या या दौऱ्याला तीव्र विरोध केला जात आहे. पालघर व मुंबई दौऱ्यावर असलेले मोदींच्या हस्ते त्यांचा ड्रीम प्रोजक्ट मानल्या जाणाऱ्या वाढवण बंदराचे आज भूमिपूजन होणार आहे. मात्र याला मासेमारी करणाऱ्या बांधवांचा नकार आहे. त्यामुळे हे बांधव रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत. त्याचबरोबर राजकोट येथे झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुर्घटनेवरुन कॉंग्रेस आक्रमक झाली आहे. पंतप्रधानांच्या मोदी दौऱ्यामुळे कॉंग्रेस नेत्यांची धरपकड आणि नजरकैद केली आहे. यामुळे कॉंग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी संताप व्यक्त केला आहे.
‘मोदी माफी मागो’ कॉंग्रेस मागणी
मालवण येथील राजकोट किल्ल्यावर काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. अवघ्या 8 महिन्यांपूर्वी या पुतळ्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. नौदलाकडून हा पुतळा बसवण्यात आला होता. हा पुतळा कोसळल्यामुळे कॉंग्रेसने टीकेची झोड उठवली आहे. तसेच नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. पंतप्रधान आज मुंबई दौऱ्यावर असल्यामुळे कॉंग्रेसने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेसने शहरात काही ठिकाणी ‘मोदी माफी मागो’, असे बॅनर्स लावले. काँग्रेस पक्षाला मोदींना काळे झेंडे दाखवायचे होते. मात्र, पोलिसांनी सकाळपासूनच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली आहे. काँग्रेसच्या नसीम खान, भाई जगताप, अस्लम शेख या प्रमुख नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच कॉंग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे.
Youth Congress workers detained for raising their voices – this is what democracy looks like under pressure. Silencing the youth won’t stop the demand for justice and accountability.
The future belongs to those who dare to speak out. #MaafiMaangoModi#माफी_मांगो_मोदी… pic.twitter.com/hqEygTcoiu
— Mumbai Congress (@INCMumbai) August 30, 2024
वर्षा गायकवाड यांना घरीच स्थानबद्ध
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यामुळे कॉंग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांना नजरकैदेमध्ये ठेवण्यात आले आहे. वर्षा गायकवाड यांना त्यांच्या ईमारतीखाली देखील पोलिसांकडून येऊ दिले जात नाहीये. मुंबई कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर मोठा पोलिसांचा फौजफाटा जमा झाला आहे. मुंबई पोलिसांनी सकाळपासून वर्षा गायकवाड यांना त्यांच्या घरीच स्थानबद्ध करुन ठेवले आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या ईमारतीखालीच धरणे आंदोलन सुरु केले. यानंतर आता मुंबई पोलीस हे वर्षा गायकवाड यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना शिवाजी पार्क याठिकाणी आंदोलनासाठी घेऊन जाणार आहेत.
मी काय अतिरेकी आहे का?
मुंबई पोलिसांनी वर्षा गायकवाड यांना घरीच अडवल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारला आहे. गायकवाड म्हणाल्या, मी काय फरार आहे का, की अतिरेकी आहे मी, एखाद्या गुन्ह्यात मी सामील आहे का? मग तुम्ही मला का पकडून ठेवले आहे? माझ्या घरच्या लोकांना मला भेटू दिले जात नाही, पत्रकारांना भेटून दिले जात नाही. इमारतीमधील कर्मचाऱ्यांना आतमध्ये येऊन दिले जात नाही. मी असा कोणता गुन्हा केलाय की पोलिसांनी मला अडवून ठेवले आहे? फडणवीस साहेब तुम्ही काय वागताय? जिथे शासन केलं पाहिजे, तिकडे तुम्ही शासन करत नाही आणि विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहात. पण आम्ही पण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, असा इशारा कॉंग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
माझ्या राजाच्या शब्दाखातर जागले ते खरे मावळे,
आजचे धूर्त सरकार केवळ सत्ता नि पैशांच्यामागे धावले..!मालवण येथील राजकोट किल्ल्यावर घडलेली घटना अतिशय निंदनीय आणि लाजिरवाणी आहे. या घटनेचा निषेध जेवढा करावा तेवढा कमीच आहे. जी घटना घडली, त्यामागे जे दोषी आहेत त्यांना सोडून इकडे… pic.twitter.com/piQ4Zesz9s
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) August 30, 2024