अंबरनाथ : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे आणि इतर पक्षाचे नाव घेत कपिल पाटील यांनी विरोधकांवर टीका केली (Kapil Patil Criticized the Opposition Parties) . देश किंवा संविधान वाचवण्यासाठी एकत्र आले नाही तर स्वतःचा पक्ष वाचवण्यासाठी एकत्र आलेत अशी टीका केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी केली होती. या टीकेला मनसे आमदार राजू पाटील यांनी सडेतोड उत्तर दिलेय (MNS MLA Raju Patil gave a befitting reply to this criticism). आमच्या पक्षाचे मालक राज ठाकरे (Raj Thackeray)…फडणवीस शेलार समर्थनासाठी (For Support) आमच्या मालकाकडे चप्पल घासतात. आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बिनशर्त पाठिंबा दिला आणि राजकीय परिस्थितीचे भान भाजपने (BJP) ठेवावे हे अपेक्षित आहे असे म्हटले आहे.
चाणक्य 2500 वर्ष पूर्वी सांगून गेले. चोर, दरोडेखोर, लुटारू, बलात्कारी आले की समजायचं राजा योग्य दिशेने चालला आहे, त्यावेळी राजा चाणक्य होते आता प्रधानमंत्री आहे, हे सगळे एकत्र आलेत याचा अर्थ असा आहे की, देशाचे प्रधानमंत्री योग्य दिशेने जातायत. अंबरनाथ येथील भाजपच्या जाहीर सभेत केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी विरोधकांना चोर दरोडेखोर, लुटारू, बलात्कारी अशी उपमा दिली.
[read_also content=”महिलांसाठी कच्ची पपई खाणे आहे आरोग्यदायी; फायदे वाचून नियमित खाल https://www.navarashtra.com/web-stories/raw-green-papaya-good-for-women-health-benefits-in-marathi-nrvb/”]
मोदी @9 अंतर्गत अंबरनाथ मध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी नऊ वर्षात केलेल्या विकास कामाचा लेखाजोखा मांडला तसेच विरोधकांवर सडकून टीका केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील नऊ वर्षांत केलेल्या विकासकामांची माहिती देण्यासाठी मोदी@9 अंतर्गत राज्यभरात उपमुख्यमंत्री आणि मंत्री यांचे दौरे सभा सुरू झाल्यात. या पार्शवभूमीवर कल्याण लोकसभा मतदारसंघातील अंबरनाथ शहरात जाहीर सभा झाली.
यावेळी बोलताना रवींद्र चव्हाण यांनी पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान बनवणार ,कोरोना काळा नंतर आपण जो श्वास घेतोय ते फक्त नरेंद्र मोदींमुळे घेतोय, देश महासत्तेकडे जाताना दिसतोय ते पण मोदींनमुळेच असेही त्यांनी सांगितले. नरेंद्र मोदींना समर्थन देण्यासाठी या 9090902024 मोबाईल नंबर वर प्रत्येकाने मिसकॉल द्या. आपल्याला 400 खासदार येत्या लोकसभा निवडणुकीत निवडून आणायचे आहेत असे आवाहन यावेळी रवींद्र चव्हाण यांनी केले.
[read_also content=”साप्ताहिक राशीभविष्य : 25 June To 1 July 2023, कसा जाईल हा आठवडा; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/web-stories/weekly-horoscope-25-june-to-1-july-2023-who-will-benefit-at-the-end-of-the-month-how-will-other-zodiac-signs-fare-this-week-read-details-in-saptahik-marathi-rashibhavishya-nrvb/”]
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी गेल्या नऊ वर्षात विकासाच्या दृष्टिकोनातून जी प्रगती झाली आहे ती प्रगती सर्व विरोधी पक्षांच्या डोळ्यात खुपते आहे अशी टीका करत भाषणाला सुरुवात केली. पुढे बोलताना मंत्री पाटील यांनी विरोधी पक्षांना देश चालवायचा नाही, संविधान वाचवायचे नाही. हे सर्व पक्ष मालकी हक्काचे पक्ष काँग्रेस पासून शरद पवार, राज ठाकरे नितीश कुमार हे सर्व मालकी तत्त्वाचे पक्ष आहेत. पक्षाचे नाव घेऊन सर्व नेत्यांचे उदाहरण त्यांनी दिले. हे सर्व स्वतःचे पक्ष वाचविण्यासाठी एकत्र आले आहेत,चोर , लुटारू, दरोडेखोर एकत्र आले की समजायचं राजा योग्य दिशेने चालला आहे, तसं हे आहे, सगळे एकत्र आले आहेत म्हणजे मोदी योग्य दिशेने चालले आहेत असा टोला विरोधकांना त्यांनी यावेळी लगावला.
आमच्या पक्षाचे मालक राजसाहेब ठाकरे आहेत हे सत्यच आहे परंतु तुमचा पक्ष मालकांचा आहे. याच आमच्या मालकांकडे फडणवीस, शेलार समर्थनासाठी शिवतीर्थावर आपल्या चपला घासतात याचे भान सन्माननीय मंत्री महोदयांनी ठेवायला हवे. आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर व विचारांवर या सरकारला बिनशर्त पाठींबा दिला आहे, आमचा मान व सध्याच्या राजकीय परिस्थितीचे भान भाजपने ठेवावा हे अपेक्षित आहे. आम्ही जर विरोधात गेलो तर महाराष्ट्रात भाजपाची काय परिस्थिती होईल याचे चिंतन ‘त्यांनी’ करावे.
[read_also content=”आजचे राशीभविष्य : 25 June 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/web-stories/daily-horoscope-25-june-2023-today-rashibhavishya-in-marathi-there-will-be-intensity-in-the-relationship-of-pisces-there-is-a-possibility-of-success-in-the-political-field-nrvb/”]
केंद्रीय राज्य पंचायत मंत्री कपिल पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, आमदार निरंजन डावखरे, आमदार गणपत गायकवाड, आमदार किसन कथोरे, आमदार कुमार आयलानी, माजी आमदार नरेंद्र पवार यावेळी उपस्थित होते.