शिक्रापूर: शिक्रापूर ता. शिरूर येथील पुणे अहिल्यानगर महामार्ग लगतच्या अनेक व्यावसायिकांना अतिक्रमण बाबत कोणतेही नोटीस न देता सार्वजनिक बांधकाम विभाग व पुणे महानगर विकास प्राधिकरण विभागाने कारवाई सुरु केली होती. दरम्यान व्यवसायिकांनी याविरोधात न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने अतिक्रमणच्या सदर कारवाईला स्थगिती दिली आहे.
शिक्रापूर ता. शिरुर येथील पुणे अहिल्यानगररोडच्या कडेच्या हद्दीतील अतिक्रमण बाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व पुणे महानगर विकास प्राधिकरण पुणे यांनी संयुक्तपणे अतिक्रमण कारवाई सुरू केली होती. मात्र याबाबत रस्त्यालगत असणारे गाळे मालक व टपऱ्याधारक यांना कुठलीही पूर्व सूचना देता कारवाई सुरु केली असताना अतिक्रमण कारवाईला स्थानिक व्यावसायिकांनी हरकत घेतली होती. त्यानुसार पुणे सिव्हिल न्यायालयात याचिका दाखल केली असता न्यायालयाने सार्वजनिक बांधकाम विभाग व पुणे महानगर विकास प्राधिकरण यांना नोटीस बजावली होती. तर न्यायालयात चार वेळा सुनावणी ठेवण्यात आली होती. या चारही सुनावणी कामी सार्वजनिक बांधकाम विभाग व पुणे महानगर विकास प्राधिकरण प्रशासन हे हजर राहिले नाही.
तर ५ मार्च २०२५ रोजी सुनावणी वेळी शिक्रापूर व्यावसायिक यांच्या वतीने ऍड, दिपक भोपे, श्रीमती तेजल आहेर व आशिष टाकळकर यांनी युक्तीवाद केले असता न्यायालयाचे न्यायाधीश यशदीप मेश्राम यांनी अखेर या कारवाईला स्थगिती आदेश दिला. सदर सुनावणी दरम्यानअखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे माजी तालुका अध्यक्ष देवेंद्र सासवडे, संतोष चौरसिया, संतोष भुजबळ, सुरेश खुरपे, शाम जकाते, मंगेश जकाते, सुजित जकाते यांसह आदी उपस्थित होते. तर याबाबत अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे माजी तालुका अध्यक्ष देवेंद्र सासवडे यांनी सांगितले की प्रशासनाने कायदेशीर कारवाई करावी.
पुणे अहिल्यानगर रोडवर शिक्रापूर हद्दीमध्ये रस्त्यालगत असणाऱ्या जमीन मालकांना रितसर नोटीस द्यावी. त्यांच्या हरकती घेऊन सुनावणी घेऊन रितसर भूसंपादनाची संयुक्त मोजणी करून भूसंपादन करावे त्याचा योग्य तो मोबदला बाधितांना द्यावा. तसेच याबाबत ग्रामपंचायत शिक्रापूरच्या ग्रामसभेत ठराव घेऊन तो मंजूर करून तो ठराव केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांना पाठवणार असून शिक्रापूर चाकण रोड रस्ता रुंदीकरण बाबत ही स्थानिक व्यवसायीक न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे देखील देवेंद्र सासवडे यांनी सांगितले.
Shikrapur Crime: शिक्रापूर पोलिसांची धडक कारवाई; डिझेल चोरणाऱ्या टोळीला अटक; कोर्टाने थेट…
डिझेल चोरणाऱ्या टोळीला अटक
शिक्रापूर ता. शिरुर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वारंवार रात्रीच्या सुमारास वाहनांतील डिझेल चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिक हैराण झाले होते. दरम्यान या डिझेल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी सुनील रामचंद्र दुबे, ओंकार शिवाजी घाडगे, सुभाष दगडू मालपोटे, संदीप तुळशीराम वाघमारे, कुणाल सोमनाथ पवार व गणेश भाऊसाहेब मूरकुटे या सहा जणांना अटक करत डिझेल तसेच दोन कार जप्त केल्या आहेत.