संग्रहित फोटो
सांगली : पुणे-सांगली प्रवास रेल्वेने करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी असणार आहे. रेल्वे स्थानकादम्यान सुरू असलेल्या कामांमुळे पुणे-एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस दोन महिन्यांसाठी रद्द करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाकडून ही रेल्वे सेवा 2 महिन्यासांठी रद्द करण्यात आली असून, ही रेल्वे सेवा पुणे-सांगली मार्गे बंद आहे. 18 जानेवारी ते 12 एप्रिलपर्यंत ही रेल्वेसेवा पुणे-सांगली मार्गे बंद असणार असल्याची माहिती आहे.
हेदेखील वाचा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते 16 जानेवारीला ‘या’ खास कार्यक्रमाचे होणार उद्घाटन, 1000 स्टार्टअप्स होणार सहभागी
पुणे-एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस पनवेल, मडगाव मार्गे दोन महिन्यांसाठी सुरू राहणार आहे. दक्षिण-पश्चिम रेल्वे अंतर्गत असणाऱ्या कॅसलराक ते कुलम रेल्वे स्थानकादरम्यान काम सुरू आहे. रेल्वे स्थानकादरम्यान सुरू असलेल्या कामांमुळे, प्रवाशांच्या सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वे प्रशासनाकडून सातारा, सांगली आणि मिरजमार्गे जाणारी एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस दोन महिन्यांसाठी रद्द करण्यात आली आहे. मिरज रेल्वे कृती समितीकडून माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता सातारा, सांगली आणि मिरज कोल्हापूरमधून केरळला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.
जर आपण एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेसचा वापर करून प्रवास करणार असाल तर, दोन महिन्यांसाठी इतर मार्ग किंवा इतर वाहनांचा वापर करून प्रवास करावा. कारण दोन महिन्यांसाठी रेल्वे सेवा पुणे-सांगली मार्गे बंद असणार आहे.
पनवेल, मडगावमार्गे धावणार
18 जानेवारी ते 12 एप्रिलपर्यंत ही रेल्वे सेवा पुणे-सांगली मार्गे बंद असणार असून, ही एक्स्प्रेस पनवेल, मडगाव मार्गे दोन महिन्यांसाठी सुरू राहणार आहे. यामुळे पुणे ते नागपूर रेल्वे सेवा 18 जानेवारी ते 12 एप्रिल आणि बेळगावकडून पुण्याकडे जाणारी एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस 20 जानेवारीपासून 14 एप्रिलपर्यंत बंद असणार आहे.
रेल्वेचे काम सुरु
दक्षिण-पश्चिम रेल्वे अंतर्गत असणाऱ्या कॅसलराक ते कुलम रेल्वे स्थानकादरम्यान काम सुरू आहे. त्यामुळे ही एक्सप्रेस पनवेल, मडगाव मार्गे दोन महिन्यांसाठी सुरू राहणार आहे. रेल्वे स्थानकादरम्यान सुरू असलेल्या कामांमुळे, प्रवाशांच्या सुरक्षा कारणास्तव रेल्वे प्रशासनाकडून सातारा, सांगली आणि मिरजमार्गे जाणारी एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस दोन महिन्यांसाठी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेदेखील वाचा : Special Story : वाल्मीक कराडला लागलेला मकोका कायदा नक्की काय आहे? काय होऊ शकते शिक्षा? वाचा सविस्तर