बजाज पुणे ग्रँड टूर–२०२६ (फोटो - punegrandtour.in)
पुण्यात बजाज पुणे ग्रँड टूरचे आयोजन
जिल्हा प्रशासनाने केली जय्यत तयारी
नांदेड सिटीच्या इथे होणार समारोप
पुणे: ‘बजाज पुणे ग्रँड टूर–२०२६’ अंतर्गत टप्पा क्रमांक दोनच्या आयोजनासाठी पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली असून हा टप्पा बुधवार, दि. २१ जानेवारी २०२६ रोजी दुपारी दिड वाजता लेडीज क्लब, कॅम्प येथून सुरू होणार असून नांदेड सिटी सिंहगड रोड येथे समारोप होणार आहे.
या टप्प्यात पुणे शहर, पुरंदर आणि राजगड आणि हवेली तालुक्यातून ही रेस जाणार आहे. यास्पर्धेची एकूण एकूण १०९.१५ किलोमीटर आहे. ही स्पर्धा फक्त महाराष्ट्राची नव्हे तर देशाची सर्वात मोठी स्पर्धा असणार आहे. स्पर्धेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्याचा इतिहास पुढे येणार आहे असून एक नवीन इतिहास जगासमोर आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. प्रशासनासोबत स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे.
असा असेल स्पर्धेचा टप्पा-२
लेडीज कल्ब, कॅम्प येथून प्रारंभ होऊन गोळीबार चौक, कोंढवा, येवलेवाडी, भिवरी, चांबळी, कोडीत, नारायणपूर, चिव्हेवाडी, केतकावळे, कापूरहोळ, कासुर्डी, मोहरी, जांबळी, आंबवणे, करंजावणे, वांगणी, निघडे, कुसगाव, शिवापूर, कोंढणपूर, सिंहगड घाट रोड, डोणजे, किरकिटवाडी, खडकवासला आणि नांदेड सिटी सिंहगड रोड येथे स्पर्धेचा शेवट होणार आहे.
मुळशी-कोळवण रस्त्यावर सायकलस्वारांचा अपघात
पुणे जिल्हा प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी एक मोठी घटना आज (दि.20 जानेवारी) मुळशी तालुक्यात घडली. ‘पुणे ग्रँड चॅलेंज सायकल टूर’ दरम्यान मुळशी-कोळवण रस्त्यावर अरुंद रस्त्याचा अंदाज न आल्याने सायकलपटूंचा अपघात झाला. यामध्ये ७० हून अधिक सायकलपटू एकमेकांवर आदळले असून अनेक खेळाडू जखमी झाले आहेत.
मुळशीतील कोळवण रोडवरून ही स्पर्धा जात असताना रस्त्याची रुंदी अचानक कमी झाली. ताशी ६० ते ७० किमी वेगाने धावणाऱ्या सायकलपटूंना या अरुंद रस्त्याचा आणि तीव्र वळणाचा अंदाज आला नाही. आघाडीच्या सायकलपटूचा ताबा सुटल्याने मागून येणारे खेळाडू एकापाठोपाठ एक एकमेकांवर आदळले. या साखळी अपघातामुळे अनेक खेळाडू ट्रॅक सोडून बाजूला फेकले गेले.
हे देखील वाचा : पुणेकरांना मनस्ताप? Grand Challenge Tour मुळे ‘हे’ रस्ते बंद; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
या अपघातामध्ये 70 सायकलपटू एकमेकांवर आदळले आहेत. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय सायकलस्वार असलेले 7 स्पर्धक दुखापतग्रस्त झाले आहेत. यामुळे प्रशासन आणि नियोजकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. काल सोमवार (दि.19 जानेवारी) रोजी स्पर्धेचा पहिला टप्पा म्हणजेच ‘प्रोलॉग’ (Prolog) पार पडला.शहराच्या मध्यभागी झालेल्या पहिल्या टप्प्याचा अनुभन हा पुणेकरांनी घेतला. Prologue स्पर्धेचा उद्देश: यातून स्पर्धकांचा वेग (Speed), तांत्रिक कौशल्य आणि शारीरिक क्षमतेची चाचणी घेतली जाईल.






