• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Forest Fires Has Increased Significantly In Purandar Taluka Forest Department

पुरंदरचा वनविभाग कुठे आहे? ‘या’ कारणांमुळे नागरिक उपस्थित करतायत प्रश्न; वाचा संपूर्ण प्रकरण

पुरंदर तालुक्यातील किल्ले पुरंदरचा परिसर, चीव्हेवाडी घाट परिसर, सासवड जवळील वाघ डोंगर, काळदरी, पानवडी, ग्रामीण भागातील छोटे मोठे डोंगर या उन्हाळ्याच्या काही दिवसांत अक्षरशः जळून नष्ट झाला.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 27, 2025 | 09:29 PM
पुरंदरचा वनविभाग कुठे आहे? ‘या’ कारणांमुळे नागरिक उपस्थित करतायत प्रश्न; वाचा संपूर्ण प्रकरण
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सासवड /संभाजी महामुनी: पुरंदर तालुक्यात वनांना आगी लागण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. वनांना लागलेल्या आगीत नैसर्गिक वनसंपदा मोठ्या प्रमाणात नष्ट होत आहेत. मोठमोठाली झाडे जळून पशुपक्षांची  आश्रयस्थाने नष्ट होत आहेत. त्याच बरोबर शेतातील शेतकयांच्या फळबागांचे नुकसान होत आहे. त्यामळे पशुं पक्षी मित्र आणि शेतकरी टाहो फोडत आहेत. मात्र वनविभागाकडून अद्याप कोणत्याही उपाययोजना केल्याचे दिसून येत नसल्याने सर्वजण हतबल झाले आहेत. त्यामुळे पुरंदरचा वनविभाग कोठे आहे ? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

मागील आठवड्यात दिवे, सोनोरी, वनपुरी, उदाचीवाडी, गुरोळी, सिंगापूर आदी गावांना समांतर असलेल्या डोंगराला दुपारच्या वेळी वणवा लागल्याचे दिसून आले. मात्र नंतर एवढा भडकला, संपूर्ण डोंगर जळून खाक झाले. सायंकाळच्या वेळी त्याची तीव्रता वाढतच राहिली. उदाचीवाडी गावातील नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही उदाचीवाडी येथील सुभाष मगर यांची आंब्याची आणि इतर कित्येक झाडे त्यामध्ये नष्ट झाली परंतु वन विभागाने कोणतीही दखल घेतली नसल्याचे समोर आले आहे.

” आम्ही झाडकरी ” मिञांनी लावलेली साडे चारशे झाडे आगीत भस्मसात.

सासवड येथील सोपान नगरच्या जवळ सुमारे साडेचारशे विवीध प्रकारची झाडे आम्ही झाडकरी या सामाजिक संस्थेच्या मिञांनी लावली होती याचे संगोपन देखील चांगले केले होते. झाडांना खते, कीडनाशके टाकुन त्याला ड्रीप द्वारे पाणी देण्याची व्यवस्था स्वखर्चाने केली होती. परंतु दोन दिवसापूर्वी अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीत सर्व झाडे जाळुन नष्ट झाल्याची माहिती आम्ही झाडकरी मित्र परिवारातील मिलींद गुजर यांनी दिली आहे. आंबा, जांभूळ अशा विविध प्रकारची झाडांच्या बिया आणुन त्यांचे संगोपन केले होते.

सामाजिक वने वाचाविण्याबाबत वनविभाग उदासीन. ,,,

पुरंदर तालुक्यातील किल्ले पुरंदरचा परिसर, चीव्हेवाडी घाट परिसर, सासवड जवळील वाघ डोंगर, काळदरी, पानवडी, ग्रामीण भागातील छोटे मोठे डोंगर या उन्हाळ्याच्या काही दिवसांत अक्षरशः जळून नष्ट झाला. मात्र वन विभागाने अद्यापपर्यंत एकही कारवाई केल्याचे दिसून आले नाही. दरवर्षी आग लावण्याचे प्रकार होत असताना त्यावर कोणत्याही उपाययोजना होत नाहीत. समाज कंटकानी कित्येक ठिकाणी आगी लावल्या. मात्र एकही कारवाई दिसून आली नाही.

पुरंदर मधील वन संरक्षण समित्या फक्त सत्कारासाठी.

वन विभागाला सहकार्य करणे. ग्रामीण भागातील वनांचे संरक्षण करणे, वन्य प्राण्यांच्या हत्या रोखणे, वृक्षतोड थांबविणे,वनांना आगी लागल्यास नागरिकांची मदत घेवून ती आटोक्यात आणणे, वन विभाग करून राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजना प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्यासाठी गावोगावी वन संरक्षण समित्या स्थापन केल्या. मात्र या समित्या वर्षानुवर्षे केवळ कागदावरच राहिल्या असून समिती मधील पदाधिकारी ग्रामसभा, गावच्या कार्यक्रमात फक्त हार तुरे स्वीकारणे, अग्नपत्रिकेत नाव छापून सत्कार घेण्यात व्यस्त आहेत. स्थानिक गावातील नागरिकांना या समिती बद्दल फारसी माहिती दिली जात नाही. ग्रामपंचायत कारभारी त्यांच्या सोयीच्या व्यक्तींची नेमणूक करीत असल्याने केवळ एकमेकांची मर्जी राखण्यासाठी त्याचा उपयोग होत असल्याचे दिसत आहे.

Web Title: Forest fires has increased significantly in purandar taluka forest department

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2025 | 09:29 PM

Topics:  

  • Purandar
  • Saswad
  • tree cutting

संबंधित बातम्या

Saswad News: पगाराशिवाय काम कसे करायचे? सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन
1

Saswad News: पगाराशिवाय काम कसे करायचे? सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
रंगांच्या उधळणीसाठी सज्ज व्हा! होळी पार्टीसाठी घराची अशी करा आकर्षक आणि रंगीत सजावट, पाहुणेही होतील खुश

रंगांच्या उधळणीसाठी सज्ज व्हा! होळी पार्टीसाठी घराची अशी करा आकर्षक आणि रंगीत सजावट, पाहुणेही होतील खुश

Feb 25, 2026 | 02:05 PM
OnePlus 15R होणार महाग? भारतात डिव्हाईसची किंमत वाढवण्याचा कंपनीने दिला इशारा, खरेदीपूर्वी वाचा सविस्तर

OnePlus 15R होणार महाग? भारतात डिव्हाईसची किंमत वाढवण्याचा कंपनीने दिला इशारा, खरेदीपूर्वी वाचा सविस्तर

Feb 25, 2026 | 02:03 PM
Nanded News : ‘महाज्योती’चे प्रशिक्षणच झाले ठप्प; इंटरनेटची अस्थिरता, वारंवार खंडित होणारी वीजपुरवठा व्यवस्था

Nanded News : ‘महाज्योती’चे प्रशिक्षणच झाले ठप्प; इंटरनेटची अस्थिरता, वारंवार खंडित होणारी वीजपुरवठा व्यवस्था

Feb 25, 2026 | 01:55 PM
Samruddhi Mahamarg 1150 Crore Scam: समृद्धी महामार्गात १,१५० कोटी रुपयांचा घोटाळा!  दानवेंचा  भुमरेंवर गंभीर आरोप

Samruddhi Mahamarg 1150 Crore Scam: समृद्धी महामार्गात १,१५० कोटी रुपयांचा घोटाळा!  दानवेंचा  भुमरेंवर गंभीर आरोप

Feb 25, 2026 | 01:54 PM
परदेशातही रणबीर कपूरचा डंका; ‘Ramayana’ च्या स्क्रीनिंगला प्रेक्षकांची गर्दी, सोशल मीडियावर पहिला Review

परदेशातही रणबीर कपूरचा डंका; ‘Ramayana’ च्या स्क्रीनिंगला प्रेक्षकांची गर्दी, सोशल मीडियावर पहिला Review

Feb 25, 2026 | 01:53 PM
Trump 2026: मैत्री की गळ्याचा फास? डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा काढली पाकिस्तानची लायकी; ‘या’ एका विधानाने जागतिक स्तरावर फजिती

Trump 2026: मैत्री की गळ्याचा फास? डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा काढली पाकिस्तानची लायकी; ‘या’ एका विधानाने जागतिक स्तरावर फजिती

Feb 25, 2026 | 01:48 PM
Dombivli Crime: 10 बिअर व 45 गोळ्यांचे केले सेवन…, डोंबिवलीत नामांकित डॉक्टरचा आत्महत्येचा प्रयत्न; कारण काय?

Dombivli Crime: 10 बिअर व 45 गोळ्यांचे केले सेवन…, डोंबिवलीत नामांकित डॉक्टरचा आत्महत्येचा प्रयत्न; कारण काय?

Feb 25, 2026 | 01:47 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM
Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Feb 24, 2026 | 07:53 PM
Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Feb 24, 2026 | 07:48 PM
Latur Unseasonal Rainfall : अवकाळी पावसात घराचे पत्रे उडाले ,मूकबधीर कुटुंबाची दैना

Latur Unseasonal Rainfall : अवकाळी पावसात घराचे पत्रे उडाले ,मूकबधीर कुटुंबाची दैना

Feb 24, 2026 | 07:43 PM
शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

Feb 24, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.