वडगाव मावळमध्ये बिबट्याचा वावर असून उपाययोजनेसाठी म्हाळसकर यांचे वनविभागाला निवेदन दिले (फोटो - सोशल मीडिया)
वडगाव मावळ : महाराष्ट्रामध्ये सध्या बिबट्यांचा वावर हा एक चर्चेचा विषय ठरला. शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बिबट्या शिरत आहे. तसेच शेतीमध्ये आणि गावांमध्ये देखील बिबट्या मोकाट फिरत आहेत. शिकारीच्या शोधामध्ये हे बिबट्या मानवी वस्त्यांमध्ये शिरत असल्यामुळे काळजी व्यक्त केली जात आहे. शहर परिसरात बिबट्याचा वावर दिसून आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी–शिवसेना महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार अँड. मृणाल गुलाब म्हाळसकर यांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. याबाबतचे अधिकृत निवेदन वनविभागाकडे सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, “वडगाव शहरात बिबट्याचा वावर आढळल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही तातडीने वनविभागाशी संपर्क साधला आहे. राज्यभरातील अनेक नागरी वसाहतींमध्ये बिबट्यांचे प्रमाण वाढले असून दुर्दैवाने अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. वडगावमध्ये अशी दुर्दैवी घटना घडू नये यासाठी हे निवेदन देण्यात आले आहे.” तसेच, वनविभागाने या गंभीर परिस्थितीची तात्काळ दखल घेऊन पुढील उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली आहे
आम्ही दोघे भाऊ-भाऊ! ठाकरे बंधूनी टाकला डाव; ‘या’ महापालिकेत युती, मविआ काय करणार?
बिबट्याचा तातडीने शोध घेण्याची ग्रामस्थांनी मागणी केली आहे. यासाठी पिंजरे लावून जेरबंद करण्याची मोहीम आखण्यात आली आहे. त्याचबरोबर पकडलेल्या प्राण्याला सुरक्षित वनक्षेत्रात हलविणे, नागरिकांना आवश्यक खबरदारीचे मार्गदर्शन करण्यात आले आहे. अँड. मृणाल म्हाळसकर यांनी स्पष्ट केले की, “नागरिकांच्या जीविताची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. वडगावमधील प्रत्येक नागरिक सुरक्षित राहावा यासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत.” असे देखील त्या म्हणाल्या आहेत. वडगाव शहरात वाढलेल्या या धोक्याच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने तातडीने कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.
दिल्लीकर श्वासातून घेतायेत विष; ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी व्यक्त केली चिंता
मावळ तालुक्यातील साळुंब्रे गावात बिबट्याची दहशत कायम असताना, काल (दि.25 नोव्हेंबर) रात्री शिकार शोधत फिरत असलेला बिबट्या ग्रामस्थांच्या जागरूकतेमुळे आणि धाडसी भूमिकेमुळे परत पळाला. प्रगतशील शेतकरी दिलीप राक्षे आणि गावातील काही तरुणांनी परिस्थितीची तात्काळ दखल घेऊन बिबट्याला हुसकावून लावण्यात यश मिळवले. रात्री उशिरा शेताजवळ हालचाल ऐकू आली तसेच कुत्र्यांच्या सलग भुंकण्यामुळे संशय निर्माण झाला. तपासणीसाठी गेलेल्या तरुणांना अंधारात बिबट्याचे स्पष्ट दर्शन झाले. लगेचच दिलीप राक्षे यांनी आसपासच्या शेतकऱ्यांना सतर्क केले आणि सर्वांनी मिळून आवाज, टॉर्चचा प्रकाश आणि साधनांचा उपयोग करून बिबट्याला परत जंगल भागाकडे हुसकावले. या प्रसंगानंतर गावात भीती आणि सावधगिरीचे वातावरण आणखीनच वाढले आहे. बिबट्याचा वावर सतत असल्यामुळे रात्री गावातील हालचाल लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. शेतकरी जनावरांच्या सुरक्षेबाबत अधिक सतर्क झाले आहेत.






