पुणे : विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये तसे शैक्षणिक संस्था आणि क्लासेस तसे कमी नाहीत. पुण्यामध्ये राज्यभरातून अनेक विद्यार्थी शिकायला येत असतात. अशाच एका पुण्यातील शैक्षणिक क्लासेसचे थक्क करणारे यश आपण पाहणार आहोत. श्रीगुरू क्लासेसच्या रसाळ गुरुजींचे रसाळ पॅटर्नने येथील मुलींनी सर्वाधिक गुण मिळवून केंद्रीय स्पर्धेत भव्यदिव्य यश प्राप्त करून क्लासेसचे नाव उज्जवल केले आहे.
राष्ट्रीय स्तरावरील नवोदय परीक्षेत यश
इयत्ता पाचवीच्या राष्ट्रीय स्तरावरील नवोदय परीक्षेत श्रीगुरू क्लासेसच्या कु. मुक्ता गजानन नरवडे या विद्यार्थिनीने सर्वाधिक गुण मिळवून पुणे जिल्ह्यातून 60 वा क्रमांक मिळवला. या स्पर्धेत 22 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी बसले होते, त्यापैकी त्यांच्या विद्यार्थिनीने सर्वाधिक 98 गुण प्राप्त करून राष्ट्रीय स्तरावरील जवाहर नवोदय विद्यालयात आपले स्थान प्राप्त केले. त्याचबरोबर कु. मुक्ता नरवडे ( गुण 250/300), कु. राधिका फपाळ ( गुण 210/300), कु. वैष्णवी भरड (NMMS) तीन विद्यार्थिनींची स्कॉलरशीपसाठी जिल्हा यादीत निवड झाली.
संस्कृत विषयात अभूतपूर्व यश
या वर्षी श्रीगुरु कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थिनींनी संस्कृत विषयात अभूतपूर्व यश प्राप्त केले. कु. अनुष्का देशमुख (100/100), कु. कृतिका भावे (99/100), कु. मृण्मयी पाटील (98/100), राधिका पांडे (98/100), कु.ज्ञानेश्वरी लोखंडे (97/100), कु. समृद्धी कशाळे (97/100) या विद्यार्थिनींनी संस्कृत विषयात उत्तम गुण केले आहेत. विद्यार्थिनींनी त्यांच्या य़शाचे श्रेय श्रीगुरु कोचिंग क्लासेसच्या रसाळ गुरुजींना दिले आहे. त्यांनी घेतलेल्या ठराविक वेळात त्यांच्याकडून विशेष तयारी करून घेतली.