पूर्व पुण्यातील वाहतूक कोंडी लवकरच सुटणार (फोटो- istockphoto)
पुणे: शहराच्या पूर्व भागात वाढत्या लोकसंख्येमुळे आणि वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे आता मेट्रोचा विस्तार हा काळाची गरज बनला आहे. याच पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा मेट्रो) लवकरच रामवाडी ते वाघोळी या ११.६३ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिकेसाठी निविदा प्रक्रिया सुरू करणार आहे.
हा प्रस्तावित विस्तार मेट्रो लाईन २ (वानवडी-रामवाडी) चा पुढील टप्पा आहे. रामवाडीहून वाघोलीमार्गे विठ्ठलवाडीपर्यंत हा मार्ग जाणार असून, एकूण ११ स्टेशन उभारली जाण्याची योजना आहे. पूर्व पुण्यातील वाघोली परिसरातील प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे.
दुहेरी संरचनेचा फ्लायओव्हर
या मार्गावर महा मेट्रोकडून एक अभिनव ‘डबल डेक्कर’ फ्लायओव्हर उभारण्यात येणार आहे. म्हणजे वरच्या स्तरावर मेट्रो मार्गिका आणि खालच्या स्तरावर वाहतुकीसाठी रस्ता असेल. यामुळे जागेचा उत्तम वापर होणार असून, पुणेकरांना अखंड आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळेल. तो पुणे शिरूर उन्नत रस्त्याचा भाग असेल.
Pune News: पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार! राज्य शासनाने ‘या’ 2 Metro मार्गांना दिली मंजूरी






