पुणे महानगरपालिका (फोटो- istockphoto/टीम नवराष्ट्र)
यापुर्वी नाेटीस देण्यात अालेल्यांना अाता काम थांबविण्याचे अादेश देण्यास सुरुवात केली अाहे. बांधकाम विभागातील अभियंत्यांनी झोन एक ते झोन सहामध्ये सर्वेक्षण करून ज्या ठिकाणी धूळ रोखण्यासाठी उपाययोजना केली नाही, अशा बांधकाम प्रकल्पांना नोटिसा बजावण्यात येत अाहेत. यामध्ये काम थांबविण्याच्या सर्वाधिक नोटिसा या झोन सहामधील लोहगाव, हडपसर, केशवनगर, उंड्री, पिसोळी या भागातील बांधकामांना देण्यात आलेल्या आहेत.
झोन पाचमध्ये एकही काम थांबविले नाही
बांधकाम विभागाचे झोन एक ते झोन सहा असे विभाग आहेत. सर्व विभागांना आज सकाळी नियमांचे पालन न करणाऱ्या प्रकल्पांना थेट काम थांबविण्याची नोटीस देण्याचे आदेश दिले होते, पण झोन पाचकडून ६७ बांधकाम प्रकल्पांना नोटीस बजावण्यात आली, पण त्यांचे काम न थांबविता उपाययोजना करण्यासाठी ७ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या विभागात कडक कारवाई करण्यात आलेली नाही.
महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या नियमावतील तरतुदी पुढील प्रमाणे
– बांधकामाच्या सिमाभिंतीला २५ फूट उंचीचे पत्रे लावणे
– बांधकाम सुरू असलेला भाग हिरव्या कापडाने झाकणे
– या कापडावर पाणी मारून धूळ उडण्यावर नियंत्रण आणणे
– रस्त्याच्या कडेला काम सुरू असल्यास त्यावर वर्दळीच्या वेळी पाणी मारणे
– राडारोडा वाहतूक करताना तो झाकून न्यावा
– राडारोडा व बांधकाम साहित्य वाहतूक करणाऱ्या गाड्यांची टायर धुण्याची व्यवस्था असावी
– बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्यांना गॉगल, मास्क, हेल्मेटसह अन्य साधणे द्यावेत
– गाड्यांमधून माल उतरविताना परिसरात पाणी मारावे
झोन निहाय काम बंद करण्याचे आदेश
झोन एक – ४४
झोन दोन – १५
झोन तीन – ८
झोन चार – १६
झोन पाच – ६७
झोन सहा – २२