पुणे महानगरपालिका (फोटो -istockphoto )
पुणे:आर्थिक वर्षातील शेवटच्या स्थायी समितीमध्ये सुमारे दिडशे काेटी रुपयांच्या ११२ प्रस्तांवाना मंजुरी िदली गेली. विशेष म्हणजे ८९ विषयांचे प्रस्ताव हे एेनवेळी दाखल करून मान्य केले गेले. गुरुवारी उशिरा पार पडलेल्या या समितीच्या बैठकीकडे डाेळे लावून बसलेले अनेक माजी नगरसेवक अािण भाजपचे पदाधिकाऱ्यांनी महापािलकेत ठाण मांडले हाेते.
आयुक्त तमहापालिकाथा प्रशासक डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची बैठक झाली. या बैठकीच्या कार्यपत्रिकेवर २३ विषय होते. पीएमपीएमएलला विधार्थी पाससाठी निधी देणे, घनकचरा विभाग, टॅकरने पाणी पुरवठा करणे, महिलादिनानिमित आयोजित कार्यक्रमाचे बिल देणे याचा समावेश होता. या बैठकीत ऐनवेळी ८९ प्रस्ताव दाखल मान्य करण्यात आले.
यामध्ये उरूळी देवाची येथे पाण्याचे टॅकर देणे, पीएमपीएलसाठी इलेक्ट्रीक चॉजिग स्टेशन, शहरातील विविध पुलावर मायक्रो सर्पसिंग करणे, स्वच्छसाठी बकेट खरेदी करणे, क्षयरोग रूग्णांना मोफत पोषक आहार पुरविणे, विविध भागातील ड्रेनेज लाईनची कामे करणे यासह विविध कामाचा समावेश आहे. धायरी, नऱ्हे, नांदोशी, सणसवाडी, किरकिटवाडी या गावातील विकास कामाबाबत प्रस्ताव हाेते. पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने बालवाडी, शाळामध्ये विविध सोयी सुविधा देण्याबाबतचे प्रस्तावांनाही मान्यता देण्यात आली.
कार्यपत्रिकेपेक्षा दाखल मान्यचे प्रस्ताव अधिक
शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा किंवा ताडीचा विषय असेल तर तो स्थायी समितीच्या बैठकीला आयत्यावेळी दाखल करून मान्य करण्यात येतो. मात्र या नियमाचा आता दुरुपयोग केला जात आहे. स्थायी समितीच्या कार्यपत्रिकेवर महत्त्वाचे विषय आणले तर त्याची चर्चा होते. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून स्थायी समितीमध्ये दाखल मान्य विषय आणण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे.
बैठकीतच थेट भाजपचे पदाधिकारी घुसले
शेवटच्या स्थायी समितीच्या बैठकीला तर कहरच झाला. सत्ताधारी भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट पक्षातील माजी नगरसेवकांसह सत्ताधारी पक्षातील पदाधिकारी पालिकेत ठाण मांडून होते. काही मोजके वगळता एरव्ही पालिकेत माननीय फिरकत नसतात. मात्र, गुरूवारी आर्थिक वर्षातील शेवटची स्थायी समितीची बैठक झाली. या बैठकीत बहुतांश विषय हे वर्गीकरणाचे असल्याचे सांगितले जात आहे. ज्या योजनांवर निधी खर्च झाला नाही. तो निधी आपल्या प्रभागात वळवणे, मर्जीतल्या ठेकेदारांची बीलांसाठी निधी, मंजुऱ्या यासाठी मोठी धडपड सुरू होती. स्थायी समितीच्या बैठकीतच थेट भाजपचे पदाधिकारी घुसल्याने पालिकेत उलट सुलट चर्चा होती.
Pune Budget 2025: आयुक्तांनी सादर केले 12 हजार कोटींचे बजेट; कराबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय
आयुक्तांनी सादर केले 12 हजार कोटींचे बजेट
महापालिकेचे 2025-26 या आर्थिक वर्षाचे सुमारे साडे बारा हजार काेटी रुपयांचे अंदाजपत्रक प्रशासक तथा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी मंगळवारी सादर केला. सुमारे १२ हजार ६१८.०९ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकात महसुली कामांसाठी ७ हजार ९३ कोटी आणि भांडवली कामांसाठी सुमारे ५ हजार ५२४ कोटी रुपयांची तरतुद केली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत या अंदाजपत्रकात एक हजार काेटी रुपयांनी वाढ झाली आहे. काेणतीही करवाढ प्रस्तावित करतानाच, यंदा मीटर द्वारे पाणी पट्टी आकारणी सुरु केली जाईल असे आयुक्त भाेसले यांनी स्पष्ट केले आहे.