पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी (फोटो- टीम नवराष्ट्र)
पुणे: स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना घेऊन बंदूक सोबत बाळगली जाते. विशेष म्हणजे, या पिस्तुलाचा उपयोग प्रत्यक्षात करण्याची गरज भासत नाही. यात वापरलेल्या प्रत्येक गोळीचा हिशेब द्यावा लागतो. आपल्याकडे बंदूक असल्यास लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्यामुळे बंदूक परवाना मिळविण्यासाठी आटापिटा केला जातो. तर गेल्या काही दिवसांपासून परवना असलेल्या बंदुकीचा गैरवापर होत आहे, त्याकडे माहिती पुणे जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे लक्ष वेधले असता, ते म्हणाले, जिल्ह्यातील परवानाधारक बंदुकबाज याची पडताळणी केली जाईल,त्यांना आज खरेच शस्त्राची गरज आहे का, हे पाहिले जाईल.
साताऱ्यात जिल्हाधिकारी असतांना आदर्श शाळा आणि स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र तयार केले होते. हाच सातारा पटर्न जिल्ह्यातही राबविण्यात येणार असल्याचा मानस नवनियुक्त जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी पत्रकार परिषदेत बोलून दाखवला. यावेळी बोलतांना डुडी म्हणाले की, आदर्श शाळा आणि स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र प्रकल्प प्रायोगिक तत्वावर नाही तर संपूर्ण जिल्ह्यात राबविणात येणार आहे.
जिल्हा नियोजन समितीतील निधी बरोबर शासनाच्या विविध योजनांच्या निधीचा वापर करण्यात येणार आहे लाभ घेण्यात येईल. जिल्हा परिषदेच्या मदतीने प्रत्येक गावात एक आदर्श शाळा निर्माण करण्यात येणार आहे. एका शाळेत 500 विद्यार्थी आणि कमीतकमी 15 शिक्षक असतील. आदर्श शाळेत पायाभूती सुविधा निर्माण करणे, शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे हे मुख्य धोरण असणार आहे. या शाळांमध्ये शिक्षणाबरोबर क्रिडा, सांस्कृतिक क्षेत्रात विद्यार्थी पुढे जायला हवे.
राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अनेक आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभगाने हे आदेश काढले आहेत. सामान्य प्रशासन विभगाचे अप्पर सचिव व्ही. राधा यांनी हे आदेश काढले आहेत. त्यामध्ये पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची देखील बदली करण्यात आली आहे. दरम्यान डॉ. सुहास दिवसे यांना सरकारकडून पदोन्नती देण्यात आली आहे.
पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची बदली झाली आहे. त्यामुळे आता साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे पुण्याचे नवीन जिल्हाधिकारी असणार आहेत. तर पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांची साताऱ्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे, राज्य शासनाने 10 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये काही अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे.
लाचप्रकरणी कारवाईचा अहवाल शासनाला : जितेंद्र डुडी
जिल्हा परिषदेचे लाचखोर माध्यमिक शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे आणि अधिक्षक विजयकुमार सोनवणे यांच्यावर कारवाईची शिफारस करणारा अहवाल शासनाला पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी (Jitendra Dudi) यांनी दिली. माध्यमिक शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे आणि अधीक्षक विजयकुमार सोनवणे यांना दोन दिवसापूर्वी एक लाख ७० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले होते.