ऑटोरिक्षा (फोटो-सोशल मीडिया)
चंद्रकांत कांबळे/पुणे : पुणे शहरातील ऑटो रिक्षाचालक मीटरनुसार भाडे न आकारता प्रवाशांकडून थेट मनमानी दराने पैसे वसूल करत आहेत.तसेच जादा प्रवाशी,भाडे नाकारणे उध्दट वर्तन, मीटर फास्ट अशा नियमांचे अल्लंघन केल्या प्रकरणी प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे (आरटीओ) कडून ऑटो रिक्षाचालकांना दणका देण्यात आला आहे. एप्रिल ते डिसेंबर २०२५ या नऊ महिन्यात ४,८९६ ऑटोरिक्षांची तपासणी करण्यात आली.यात १,८७७ दोषी आढळले आहेत.यावर कडक कारवाई करत आरटीओ प्रशासनाकडून १०५ परवाने निलंबिल करण्यात आले असून उर्वरित जणांवर दंडात्मक करवाई करून ८ लाख ६७ हजार रूपये दंड वसूल करण्यात आले आहे.
रिक्षा चालकांच्या मनमानी करभारावर नियंञण ठेवण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.गेल्या नऊ महिन्यात आरटीओच्या तपासणीत १,८७७ रिक्षा दोषी आढळले आहेत.यामध्ये जादा भाडे आकारलेले ८७, मिटर फास्ट ४६,जादा प्रवाशी २९,भाडे नाकारणे ११९,उध्दट वर्तन ८६, व इतर अशा एकून १,८७७ ऑटोरिक्षावर मोठी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.अनेक प्रवाशाना तक्रार कशी करावी आणि कुठे करावी यांची माहितीच नसते.त्यामुळे अनेक प्रवाशांची फसवणूक होत असते.अशा वेळी प्रवाशांनी काय केले पाहिजे यांची नेमकी कल्पनाच त्यांना नसते.यामुळे आर्थिक नुकसान आणि मानसिक ञासाला त्यांना सामोरे जावे लागते.
८२७५३३०१०१ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर
महिना तपासलेले रिक्षा दोषी रिक्षा परवाना निलंबन दंड
एप्रिल २८६ ९५ ०७ ४५ हजार
में ७४४ २७४ १७ ४४ हजार
जुन २९४ ९८ २२ २३ हजार
जुलै ३४२ १०७ ०४ १ लाख २७ हजार
ऑगस्ट ३३७ १४९ १७ ३ लाख ६० हजार
सप्टेंबर ५२९ २०८ ० ९७ हजार
ऑक्टोबर ८२६ २८६ १४ ८१ हजार
नोव्हेंबर ८६६ ४२० १४ १ लाख ३१ हजार
डिसेंबर ६७२ २६७ १२ १ लाख ८५ हजार
एकूण ४,८९६ १,८७७ १०५ ८,६७,२३१
कोणत्याही ऑटो रिक्षाचालकांनी नियमांचे पालन न केल्यास दंडात्मक व परवाना निलंबनाची कारवाई करण्यात येईल.प्रवाशाकडून जादा भाडेदर आकारणे, भाडे नाकारणे,मिटर फास्ट असणे,उध्दट वर्तन करणे अशा तक्रारी असल्यास आपले नाव, मोबाईल क्रमांक फोटोसह ८२७५३३०१०१ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवावे. प्राप्त तक्रारीवर तत्काळ कारवाई केली जाईल. – अर्चना गायकवाड, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे प्रवाशांची आर्थिक फसवणूक होऊ नये म्हणून राज्य सरकारने नियमावली बनवली आहे.प्रवाशांना तक्रार कुठे करावी यांची माहितीच नसते.त्यामुळे या संदर्भात जनजागृती करण्याची गरज आहे. नेमके रिक्षा चालक याचा फायदा घेताना दिसून येतात.यासाठी ऑटोरिक्षातच ड्रायव्हर बसतो त्यांच्या मागच्या बाजूस प्रवाशांना तक्रार करण्यासाठी चालकाचा फोटो,परमिट धारकांचे नाव,रिक्षा नंबर आणि आरटीओच्या तक्रार क्रमांकांची पाटी लावणे सर्व रिक्षाचालकांना आरटीओकडून बंधनकारक करावे,यामुळे प्रवाशांची जर फसवणूक होत असेल तर तत्काळ तक्रार करता येईल. डॉ.बाबा शिंदे, चालक मालक वाहतूक संघटना अध्यक्ष






