El Nino 2026 Forecast : पृथ्वीवर ‘हिट अलर्ट’! 'एल निनो'च्या पुनरागमनाने जगासमोर महासंकट; युरोपमध्ये उष्णतेची लाट तर ऑस्ट्रेलियात दुष्काळाचे सावट ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
El Nino 2026 Forecast : निसर्गाचे चक्र झपाट्याने बदलत असून मानवासमोर आतापर्यंतचे सर्वात मोठे हवामान संकट उभे राहिले आहे. जागतिक हवामान शास्त्रज्ञांनी २०२६ सालासाठी एक अत्यंत गंभीर इशारा दिला आहे. त्यांच्या मते, २०२६ हे वर्ष मानवी इतिहासातील आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष ठरू शकते. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे ‘एल निनो’ (El Niño) या हवामान विषयक घटनेची संभाव्य निर्मिती. विषुववृत्तीय पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान ज्या वेगाने वाढत आहे, ते पाहता आगामी काळ जगासाठी अत्यंत आव्हानात्मक असणार आहे.
जागतिक हवामान संघटनेने (WMO) एप्रिलच्या अखेरीस सादर केलेल्या अहवालानुसार, पॅसिफिक महासागरात समुद्राचा पृष्ठभाग असामान्यपणे गरम होत आहे. मे ते जुलै दरम्यान एल निनोची परिस्थिती पूर्णपणे सक्रिय होण्याची शक्यता आहे. एल निनोमुळे जागतिक तापमानात वाढ होते, ज्यामुळे जगाच्या एका भागात अतिवृष्टी आणि पूर येतात, तर दुसऱ्या भागात भीषण दुष्काळ पडतो. यंदा याचा सर्वाधिक फटका दक्षिण अमेरिका आणि आफ्रिकेच्या हॉर्न प्रदेशाला बसू शकतो, जिथे पावसाचे प्रमाण वाढून मोठ्या प्रमाणावर आर्द्रता निर्माण होईल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Hantavirus outbreak 2026 : हंताव्हायरसचा महाभयंकर विळखा! रुग्णांची संख्या 11 वर ; WHO ने लागू केले 42 दिवसांचे ‘हे’ कडक निर्बंध
Climate scientists are warning that the world may be heading toward a potentially very strong El Niño event in 2026, one that could intensify global heatwaves, floods, droughts, crop failures, and extreme weather disruptions. Multiple forecasts now show rapidly warming Pacific… — Ashok Dadhwal (@ashokdadhwal196) May 7, 2026
credit – social media and Twitter
शास्त्रज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, संभाव्य एल निनोच्या घटनेमुळे ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशिया या देशांमध्ये पावसाचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटू शकते. यामुळे या भागात भीषण दुष्काळ पडण्याची शक्यता आहे. या दुष्काळामुळे केवळ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही, तर शेती उत्पादनावरही याचा मोठा परिणाम होईल. अन्नाच्या कमतरतेमुळे महागाई वाढण्याची शक्यता असून जागतिक अन्न साखळीवर (Global Food Chain) याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.
दुसरीकडे, युरोप खंडामध्ये देखील परिस्थिती बिकट होण्याची चिन्हे आहेत. कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिसच्या अहवालानुसार, अटलांटिक आणि भूमध्य समुद्राच्या तापमानात विक्रमी वाढ झाली आहे. यामुळे युरोपमध्ये उन्हाळ्याच्या काळात प्रदीर्घ काळ चालणाऱ्या उष्णतेच्या लाटा (Heatwaves) येऊ शकतात. वाढत्या उष्णतेमुळे मानवी आरोग्यावर परिणाम होण्यासोबतच वणव्यांसारख्या (Forest Fires) घटनांमध्येही वाढ होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. डब्लूएमओचे उपसचिव को बॅरेट यांनी स्पष्ट केले आहे की, अशा परिस्थितीत ‘पूर्वसूचना प्रणाली’ (Early Warning Systems) हीच मानवी जीव वाचवण्यासाठी सर्वात महत्त्वाचे शस्त्र ठरेल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-Iran War: इराणचा ‘गुप्त शिकारी’ तैनात! अमेरिकन नौदलाला ‘Narwhal’ धसका; वाचा काय आहेत याची थरारक वैशिष्ट्ये
हवामानाच्या या लहरीपणाला तोंड देण्यासाठी अनेक देश आता विज्ञानाचा आधार घेत आहेत. चीनने याबाबतीत आघाडी घेतली असून, त्यांनी आपली आपत्ती प्रतिबंध प्रणाली अधिक हायटेक केली आहे. अतिवृष्टी आणि वादळांच्या मार्गाचा अचूक अंदाज घेण्यासाठी चीनमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI Models) आणि रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. यामुळे पूर आणि भूस्खलन यांसारख्या आपत्तींची माहिती रिअल-टाइममध्ये मिळणे शक्य झाले आहे. जगभरातील इतर देशांनीही या पावलावर पाऊल ठेवून आपले आपत्ती व्यवस्थापन मजबूत करणे काळाची गरज बनली आहे.






