सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : गेल्या काही दिवसाखाली पुणे शहरामध्ये पावसाने अक्षरशः थैमान घातले होते. अवकाळी पावसाचा जोर वाढल्यामुळे पुणे शहर पूर्णपणे जलमय झाले होते. दोन तास तुफान पाऊस पडल्यानंतर शहरातील रस्त्यांना नदी-नाल्यांचे स्वरुप आले होते. अशातचं आता रस्त्यावर साचलेल्या पावसाच्या पाण्यावरुन शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते गिरीश गुरनानी यांनी अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कोथरूड विधानसभेचे युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी कोथरूड क्षेत्रीय कार्यालय प्रमुख विजय नायकल यांची भेट घेऊन निवेदन दिले. तसेचं कंत्राटदरांना तात्काळ ब्लॅकलिस्ट मध्ये टाकून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अन्यथा आपल्या दालनाबाहेर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा गुरनानी यांनी दिला.
गुरनानी म्हणाले, कोथरूडमध्ये नुकताच पाऊस झाला व या पावसात रस्त्यात तुडुंबं भरलेले पाणी आम्हा सर्व कोथरूडकरांना पाहायला मिळाले व त्यातून झालेली ट्रॅफिक, आत्ताच केलेल्या रस्त्याची झालेली चाळण, चेंबर्समधून येणारे घाण पाणी हे सुद्धा कोथरूडकरांनी पाहिले आहे. आपण या सर्व उपयोजना पावसाच्या आगोदर करणे अपेक्षित होतं पण कॉन्ट्रॅक्टदाराकडून ही सर्व कामे पूर्ण झालेली नाहीत त्यामुळेच कोथरूडकरांना या सर्व गोष्टींचा नाहक त्रास सहन करावा लागला. निकृष्ट दर्जाचे केलेल्या रस्त्याचे काम, नालेसफाईचे काम हे आता तरी पूर्ण करावे, जेणेकरून कोथरूडकरांना अजून अडचणी सहन कराव्या लागणार नाहीत. असं गुरनानी म्हणाले.
हे सुद्धा वाचा : भरधाव डंपर राँग साईडला घुसला अन् पुढे जे घडलं ते…