• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • There Will Be Approved Members In Pune Zilla Parishad And Panchayat Samiti

Pune ZP News : पुणे ‘झेडपी’त सात स्वीकृत सदस्यांची एंट्री; सभागृहातील राजकीय हालचालींना वेग येणार

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्य नियुक्त करण्यास राज्य मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दिल्यानंतर पुणे जिल्हा परिषदेच्या राजकारणात नवे राजकीय गणित मांडले जात आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 01, 2026 | 05:03 PM
पुणे 'झेडपी'त सात स्वीकृत सदस्यांची एंट्री; सभागृहातील राजकीय हालचालींना वेग येणार

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्य नियुक्त करण्यास राज्य मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दिल्यानंतर पुणे जिल्हा परिषदेच्या राजकारणात नवे राजकीय गणित मांडले जात आहे. जवळपास २९ वर्षांनंतर स्वीकृत सदस्यपदाचा पुनर्जन्म होत असून, पुणे जिल्हा परिषदेत सात स्वीकृत सदस्यांची भर पडणार आहे. या निर्णयाचा अध्यादेश लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

पुणे जिल्हा परिषदेची सध्याची सदस्यसंख्या ७३ आहे. कायद्यानुसार जिल्हा परिषद सदस्यसंख्या किमान ५० आणि कमाल ७५ असू शकते. त्यानुसार एकूण सदस्यसंख्येच्या दहा टक्के प्रमाणात स्वीकृत सदस्य घेता येतात. मात्र किमान पाच आणि कमाल सात अशी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या निकषांनुसार पुणे जिल्हा परिषदेला सात स्वीकृत सदस्य मिळणार असून, त्यामुळे सभागृहातील राजकीय हालचालींना वेग येणार आहे. सध्याच्या पक्षीय बलाबलावर नजर टाकल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे ५१ सदस्य असल्याने त्यांना पाच स्वीकृत सदस्यांची संधी मिळू शकते. भाजपचे १० सदस्य असल्याने त्यांचा एक सदस्य निश्चित मानला जात आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहा सदस्य, शिंदे गटाचे पाच सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा एक सदस्य अशी सद्यस्थिती आहे. त्यामुळे सातव्या जागेवर नेमकी कोणत्या पक्षाची वर्णी लागणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. काही ठिकाणी आडनिड्या राजकीय समझोत्यांची कुजबुजही सुरू झाली आहे.

धोरणात्मक मुद्द्यांवर भूमिका मांडण्याची संधी

स्वीकृत सदस्यांना मतदानाचा अधिकार नसला तरी सभागृहातील चर्चांमध्ये सहभाग, विविध समित्यांमध्ये उपस्थिती आणि धोरणात्मक मुद्द्यांवर भूमिका मांडण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे सत्ताधारी गटासाठी आपली बाजू अधिक ठामपणे मांडण्याचे एक प्रभावी व्यासपीठ तयार होणार आहे. विरोधकांकडून मात्र या निर्णयाकडे वेगळ्या नजरेने पाहिले जात आहे. स्वीकृत सदस्यांच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना सभागृहात संख्याबळाचा अप्रत्यक्ष फायदा मिळू शकतो, अशी टीका काहींकडून व्यक्त होत आहे.

राजकीय रंगत वाढणार

इतिहासाच्या पानांवर नजर टाकल्यास १९९२ च्या निवडणुकीनंतर स्वीकृत सदस्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र १९९७ पासून ही तरतूद रद्द करण्यात आली आणि तब्बल २९ वर्षे जिल्हा परिषद सभागृह स्वीकृत सदस्यांशिवाय कार्यरत होते. २०१७ मध्ये जलसंधारण व जलव्यवस्थापन समितीत तज्ज्ञ सदस्य घेण्याची मर्यादित तरतूद करण्यात आली होती; परंतु ती सभागृहातील पूर्ण सहभागासमान नव्हती. आता मात्र सात स्वीकृत सदस्य थेट सभागृहात येणार असल्याने राजकीय रंगत वाढणार आहे.

भाजप, इतर घटकपक्षांच्या हालचालींवरही सर्वांचे लक्ष

पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असले तरी भाजप आणि इतर घटकपक्षांच्या हालचालींवरही सर्वांचे लक्ष आहे. सात स्वीकृत सदस्याच्या निवडीवरून भविष्यातील सत्तासमीकरणांची दिशा ठरणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. आगामी काळात स्वीकृत सदस्य कोण असतील, ते कोणत्या राजकीय पार्श्वभूमीतून येतील आणि सभागृहातील चर्चांवर त्यांचा कसा प्रभाव पडेल, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

Web Title: There will be approved members in pune zilla parishad and panchayat samiti

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 05:03 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • pune news
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

माळेगाव कारखाना क्रमांक एकचा करण्याचे अजित दादांचे स्वप्न पूर्ण करू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आश्वासन
1

माळेगाव कारखाना क्रमांक एकचा करण्याचे अजित दादांचे स्वप्न पूर्ण करू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आश्वासन

Pune students stuck in Dubai : पुण्यातील इंदिरा विद्यालयाचे 84 जण दुबईमध्ये अडकले; भारतात आणण्याचे प्रयत्न सुरु
2

Pune students stuck in Dubai : पुण्यातील इंदिरा विद्यालयाचे 84 जण दुबईमध्ये अडकले; भारतात आणण्याचे प्रयत्न सुरु

उपमहापौरांनी घेतला अरोग्यसेवांचा आढावा; अधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना
3

उपमहापौरांनी घेतला अरोग्यसेवांचा आढावा; अधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

पुण्याच्या ‘पाताळलोक’ प्रकल्पाचा मार्ग बदलणार; 32 हजार कोटींच्या भुयारी मार्गासाठी आता ‘सहा पर्यायांचा’ अभ्यास
4

पुण्याच्या ‘पाताळलोक’ प्रकल्पाचा मार्ग बदलणार; 32 हजार कोटींच्या भुयारी मार्गासाठी आता ‘सहा पर्यायांचा’ अभ्यास

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs WI Live Update: ‘करो या मरो’ सामन्यात भारताच्या पदरी नाणेफेक, वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजीसाठी केले आमंत्रित

IND vs WI Live Update: ‘करो या मरो’ सामन्यात भारताच्या पदरी नाणेफेक, वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजीसाठी केले आमंत्रित

Mar 01, 2026 | 06:45 PM
मुलासह दुबईत अडकली Subhashree Ganguly, पतीने दिली अपडेट; अभिनेत्रीची मदतीची हाक

मुलासह दुबईत अडकली Subhashree Ganguly, पतीने दिली अपडेट; अभिनेत्रीची मदतीची हाक

Mar 01, 2026 | 06:34 PM
पेपरमध्ये खुणा, तर मानला जाईल गुन्हा! परीक्षेत्तर गैरमार्गांवर कडक कारवाई; बोर्डाने व्हिडीओद्वारे जारी केली ‘शिक्षासूची’

पेपरमध्ये खुणा, तर मानला जाईल गुन्हा! परीक्षेत्तर गैरमार्गांवर कडक कारवाई; बोर्डाने व्हिडीओद्वारे जारी केली ‘शिक्षासूची’

Mar 01, 2026 | 06:19 PM
Mumbai-Goa Highway:रखडपट्टीवरून ठेकेदारांना दणका, महामार्गाचं काम रखडवणाऱ्या कंपन्यांना १६ कोटींचा दंड

Mumbai-Goa Highway:रखडपट्टीवरून ठेकेदारांना दणका, महामार्गाचं काम रखडवणाऱ्या कंपन्यांना १६ कोटींचा दंड

Mar 01, 2026 | 06:10 PM
Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Mar 01, 2026 | 05:56 PM
‘या’ Electric Bikes तुमचं कॉलेज लाइफ गाजवतील! लूक असा जो भल्याभल्या स्पोर्ट बाईकला लाजवेल

‘या’ Electric Bikes तुमचं कॉलेज लाइफ गाजवतील! लूक असा जो भल्याभल्या स्पोर्ट बाईकला लाजवेल

Mar 01, 2026 | 05:55 PM
Kalyan Crime: घरातून सोनेसह दोन बहिणी गायब! लव जिहाद केल्याचा संशय, मात्र सत्य वेगळच; नेमकं प्रकरण काय?

Kalyan Crime: घरातून सोनेसह दोन बहिणी गायब! लव जिहाद केल्याचा संशय, मात्र सत्य वेगळच; नेमकं प्रकरण काय?

Mar 01, 2026 | 05:49 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Mar 01, 2026 | 05:47 PM
Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Mar 01, 2026 | 05:09 PM
Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Mar 01, 2026 | 04:50 PM
Mumbai News :  मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mumbai News : मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mar 01, 2026 | 04:32 PM
Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Mar 01, 2026 | 03:34 PM
Virar :  जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Mar 01, 2026 | 03:31 PM
Sunil Tatkare On Rohit Pawar : भाजपकडे तिकीट मागायला कोण गेलं होतं? तटकरेंची रोहित पवारांवर टीका

Sunil Tatkare On Rohit Pawar : भाजपकडे तिकीट मागायला कोण गेलं होतं? तटकरेंची रोहित पवारांवर टीका

Feb 28, 2026 | 07:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.