सौजन्य - नवराष्ट्र टीम
शिवांजली मंडळ (काची आळी) येथून या पदयात्रेचा प्रारंभ झाला. त्यानंतर ही पदयात्रा फुलवाला चौक, शिवतेज मित्र मंडळ, कृष्णाहट्टी चौक, आणि किराड गल्ली अशा प्रमुख मार्गांवरून मार्गस्थ झाली. या प्रवासादरम्यान प्रत्येक चौकात स्थानिक गणेश मंडळांनी आणि कार्यकर्त्यांनी उमेदवारांचे जल्लोषात स्वागत केले. अंगारक संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधून उमेदवारांनी विविध मंडळांच्या आरतीला उपस्थित राहून श्रीगणेशाचे आशीर्वाद घेतले.
या पदयात्रेदरम्यान सामाजिक आणि ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊन अभिवादन करण्यात आले. आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे तालीम येथे क्रांतिगुरूंना, तसेच फुले वाड्यात महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. समताभूमी येथे या पदयात्रेचा समारोप झाला.
मुरलीधर मोहोळ यांचा विश्वास
प्रभाग क्रमांक 26 मधील उमेदवारांबद्दल बोलताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी उमेदवारांच्या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले, “भारतीय जनता पार्टीची शहरातील ताकद वाढली असून प्रभाग २६ मध्ये भाजपचे चारही उमेदवार निवडून येतील. अजय खेडेकर, स्नेहा माळवदे, विष्णू हरिहर आणि युवा उमेदवार ऐश्वर्या थोरात हे सर्वजण भरघोस मतांनी विजयी होतील. घोरपडे पेठ, गुरुवार पेठ आणि समताभूमीतील नागरिक सुज्ञ आहेत, त्यांना भाजपने केलेला विकास माहीत आहे. ते नक्कीच आमच्या चारही उमेदवारांचे पाठराखण करतील.”
नागरिकांच्या डोळ्यांतील विश्वास आणि मिळालेले प्रेम हीच आमच्या कार्याची पावती असल्याची भावना उमेदवारांनी यावेळी व्यक्त केली. या पदयात्रेने भाजपचा विजयाचा निर्धार कार्यकर्त्यांनी अधोरेखित केला असून, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
चारही उमेदवारांना कार्यकर्त्यांचा पाठिंबा
प्रभाग क्रमांक 26 हा पेठांचा भाग असल्यामुळे या भागातील नागरिकांचे प्रश्न कायम आहेत. मागच्या काळात निवडणुका प्रलंबित असल्यामुळे व प्रशासनाचा कारभार असल्यामुळे द्यायला पाहिजे तेवढा वेळ नगरसेवकरांकडून दिला जात नव्हता. त्यांच्याकडे अधिकार नसल्यामुळे प्रश्न जैसे थे उरले. तब्बन नऊ वर्षानंतर ही निवडणूक लागली असल्याने उमेदवारांबरोबरच नागरिकांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. ऐश्वर्या थोरात या उच्चशिक्षित उमेदवार असल्यामुळे व तरुण असल्याने कामाची क्षमता व व्यापक दृष्टिकोन ठेवून काम करणार असल्याचा निर्धार त्यांनी केला आहे. त्यांच्या या निर्धाराला कार्यकर्त्यांचाही मोठा पाठिंबा मिळताना पाहायला मिळत आहे. आजच्या रॅलीतील छायाचित्रांमधून भाजपने आपली घोरपडे पेठ, गुरुवार पेठ, समता भूमी या प्रभागातील ताकद पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.






