कर्जत तालुक्यातील सांगवी येथील एका फार्महाउसवर सुरु असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी धड टाकली. यावेळी, सदर फार्महाउसवरील कामगारांवर कारवाई केल्याचे समोर येत आहे. त्यामुळे मालकासह अन्य जणांवर पोलीस मेहेरबान का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सांगवी येथील सनझारा या फार्महाऊसवर रायगड पोलिसांनी धाड टाकून येथे बेकायदेशीर जुगार आणि मटका पोलिसांनी उद्ध्वस्त केला. मात्र, जागेचा मालक हा कल्याण जुगार मटका चालत असून त्याच्यावर कोणती करावी केली, याबाबत गुप्तता पाळली जात आहे. पोलिसांनी ज्या नऊ जणांवर गुन्हे दाखल केले असून ते त्याच फार्म हाऊसमध्ये काम करणारे मजूर आहेत. ज्या कामगारांवर गुन्हे दाखल झाले त्यांच्या एकच रंगाच्या पेहरावावरून हे या फार्मवर काम करणारे मजूर असल्याचे प्रसिद्धीला दिलेल्या छायाचित्रावरुन स्पष्ट होत आहे.
कर्जत पोलीस आणि दादर सागरी पोलीस ठाणे यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. या गुन्ह्याचे तपास अधिकारी गोविंद पाटील त्यांनी याबाबत प्रस्तुत त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, उत्तर देणे बंधनकारक नाही. जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्याशी संपर्क केला असता माहिती घेऊन सांगितले. त्यामुळेच फार्महाऊस मालक अब्बास शेख त्यांच्यावर पोलीस मेहरबान का झाले, असा प्रश्न उपस्थित होत आहेत.