Raigad News: वनखात्याच्या कात्रीत अडकले माथेरानचे विकासकाम! वाड्यांना जोडणाऱ्या रस्त्याचा प्रकल्प रखडला
राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा; दोन लाखांपर्यंतच्या पीक कर्जांना मुद्रांक शुल्क माफ
माथेरानच्या डोंगरात १३ आदिवासी वाड्या असून नेरळ माथेरान घाटरस्त्यातील जुम्मापट्टी धनगरवाडा पासून किरवली वाडीपर्यंत असलेल्या १३ किलोमीटर मार्गात या आदिवासी वाड्या वसल्या आहेत. अनेक धनगर समाजाचे लोकांची वस्ती तेथे वास्तव्य करीत आहेत. वन विभागाची दळी जमिनीवर या वाड्या वसल्या आहेत. वन विभाग रस्ता तयार करण्यासाठी जमीन देत नसल्याने येथील आदिवासी आपल्या रस्त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी स्वतः एकत्र येऊन पायवाट बनवीत होते. (फोटो सौजन्य – Pinterest)
सध्या आषाणे वाडी आणि सावरगाववाडी मध्ये रस्त्यांची कामे सुरु असून तशाप्रकारे हे काम पुढे पुढे जाणार आहे. परंतु ग्रुप ग्रामपंचायत माणगाव वरेडी बेकरेवाडी असलंवाडी, नान्याचा माळ, मन्याधणगर वाडा, बेकरेधणगर वाडा, वनविभाग अधिकारी अलिबाग कार्यालयाने ना मंजूर केली आहे. त्यामुळे नवीन रस्ता अर्धवट अवस्थेत राहण्याची शक्यता आहे.
हा प्रस्ताव वन विभागाने मंजूर करावा यासाठी आदिवासी कार्यकर्ते जैतू पारधी आणि गणेश पारधी हे स्थानिक ग्रामस्थ अलिबाग येथे जाऊन पाठपुरावा करीत आहेत. मात्र बनविलेला वन प्रस्ताव फेटाळल्याने आता हे आदिवासी कार्यकर्ते यांनी स्वतः आर्थिक भार उचलून प्रस्ताव बनविला आहे.
माथेरान डोंगरातील त्या सर्व आदिवासी वाड्या देश स्वातंत्र्य होण्याच्या १०० वर्षे आधीपासून अस्तित्वात आहेत. मात्र वन कायदा अस्तित्वात आला आणि त्या ठिकाणाच्या वाड्यांची जमीन वन विभागाच्या मालकीची झाली. वन जमिनीवर वसलेल्या या आदिवासी वाड्यांमध्ये जाण्यासाठी पक्के रस्ते बनविले जात नव्हते, मात्र शासनाने रस्ता बनविण्यासाठी निधी मंजूर केल्यावर वन जमीन मिळविण्यासाठी प्रयत्न झाले.
वन जमिनीचे प्रस्ताव किरवली, उमरोली आणि आसल या ग्रामपंचायतमधील वन जमिनीचे प्रस्ताव जिल्हा उपवन संरक्षक यांच्या कार्यालयाने मंजूर केले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय विकास यंत्रणांनी मंजूर केलेल्या १३ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या मार्गात किरवली बाडी, सावरगाववाडी, बोरीचीवाडी, मना धनगर वाडा, जुम्मापट्टी धनगरवाडी या वाड्या आहेत.
किरवली वाडी, आषाणेवाडी, सावरगाववाडी, बौरीचीवाडी, मना धनगर वाडा, धामणदांड, चिंचवाडी, सागाचीवाडी, आसलवाडी, नाण्याचा माळ, बेकरेवाडी, जुम्माफ्ट्टी धनगरवाडी या वाड्या आहेत, सध्या आषाणे वाडी आणि सावरगाव वाडी






