Raigad News: उरणमधील द्रोणागिरी किल्ला मोजतोय शेवटची घटिका, उरलेसुरले अवशेष जपण्याची नागरिकांची मागणी
Kolhapur News : कोल्हापुरकरांना भरली हु़डहुडी, थंडीचा तडाखा वाढला; जिल्ह्यात पारा घसरला 16 अंशांवर
प्रभू राम आणि रावण यांच्यात झालेल्या युद्धात लक्ष्मणाला बाण लागून लक्ष्मण बेशुद्ध पडले. त्यांच्या उपाचारासाठी संजीवनी आणायला गेलेल्या हनुमंताने द्रोणागिरी पर्वतच उचलून आणल्याच्या कथा आपण ऐकत आलो आहोत. त्याच द्रोणागिरी पर्वताचा एक भाग उरणच्या भूमीत पडला आणि आज तो दिमाखात द्रोणागिरी पर्वत म्हणून उभा असल्याची धारणा येथील प्रत्येक माणसाच्या मनात आहे. याच द्रोणागिरी पर्वतावर सुमारे बाराशे वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला द्रोणागिरी किल्ला आपल्या इतिहासाच्या शेवटच्या घटका मोजत आहे. (फोटो सौजन्य – instagram)
१५३० ते १५३५ या काळात पोर्तुगीजांच्या अमलाखाली आलेल्या या किल्ल्यावर पोर्तुगीजांकडून बांधलेल्या काही इमारतीमधील आज एक इमारत निसर्ग आणि इतर परिस्थितीशी झुंज देत आपला इतिहास ओरडून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. किल्ल्यावरील शिल्लक राहिलेल्या एकमेव वास्तूची देखील मोठ्या प्रमाणावर पडझड होत आहे. यामुळे येथील नागरिक या किल्ल्याचे उरलेले अवशेष यांच्याकडे शासनाने लक्ष केंद्रित करावे आणि उरणच्या इतिहासातील महत्त्वाचा पण दुर्लक्षित इतिहास सुरक्षित करावा, अशी मागणी करत आहेत.
शिलाहर काळात हा किल्ला बांधला गेला असल्याच्या खुणा येथे सापडत आहेत. तर या किल्ल्यावर अनेक शासकांनी शासन केले असून अरबी समुद्रातून होणारे आक्रमण रोखण्यामध्ये किल्ल्याची प्रमुख भूमिका होती. अनेक बदल, युद्ध, रक्तपात आणि सत्ताबदल पाहिलेला हा किल्ला आज शासकीय अनास्था आणि दुर्लक्षपणामुळे संपूर्ण नष्ट झाला आहे.
द्रोणागिरी टेकर, दिनेश पाटील म्हणाले की, ८८ आम्ही फिटनेससाठी दररोज या किल्ल्यावर येत असतो. मात्र किल्ल्याची मोडकळीस आलेली वास्तु, तुटलेली तटबंदी, नष्ट होत असलेला इतिहास कुठेतरी जपला पाहिजे. आज हा किल्ला आणि त्याचा इतिहास जपण्याचे काम शासकीय स्तरावर होणे गरजेचे होते, मात्र तसे न झाल्याने एक ऐतिहासिक ठेवा इतिहासाच्या पानावरून नष्ट होणार आहे.
स्थानिक नागरिक, नरेश रहाळकर 66 हरणस्या इतिहोणागिरी पुढच्या पिढीला मार्गदर्शक आणि प्रेरणादायी व्हावा यासाठी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन, या किल्ल्याची डागडुजी करावी. उरण तालुका मोठा आहे, तर तालुक्याचा इतिहासदेखील मोठा आहे. या इतिहासाची साक्षी देणाऱ्या अनेक वास्तूमधील ही वास्तू महत्त्वाची मानली जाते.
गडप्रेमी, रमेश पाटील म्हणाले की, येथे येणारा प्रत्येकजण इथली परिस्थिती पाहून नाराजी व्यक्त करत आहे. यामुळे येथील इतिहासाची जपणूक करण्यासाठी सरकारकडून पुढकार घेतला पाहिजे, वाच वास्तू भविष्यात आपल्या पराक्रमाचे धडे आणि इतिहासाची साक्षी नव्या पिढीला देणार आहेत.






