फोटो सौजन्य: I Stock
कर्जत/ संतोष पेरणे : कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर असलेल्या डिकसळ येथील रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथून जात असलेल्या तरुणीला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवून अश्लील हावभाव करण्याचा प्रयत्न केला.याप्रकरणी संबंधित तरुणीने नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यावर नेरळ पोलिसांनी महिला सुरक्षितता याला प्रथम प्राधान्य दिले. दरम्यान,तरुणी समोर अश्लील हावभाव करून पळून गेलेल्या तरुणाला तांत्रिक माहितीचे आधारे शोध घेऊन ताब्यात घेतले.
भिऊपुरी रोड रेल्वे स्थानक परिसरात तरुणीसमोर अश्लील कृत्य करणाऱ्याला पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. भिऊपुरी मार्गावर भाऊसाहेब राऊत शाळेच्या अलीकडे मुख्य रस्त्यावर एका दुचाकी स्वाराने खोपोली जाण्याचा रस्ता विचारला. रात्री आपल्या घरी जाण्याच्या गडबडीत असताना त्या महिलेने दुचाकी चालक रस्ता विचारत असल्याने सदर महिला हाताने रस्ता दाखवत असताना आजूबाजूला कोणी नाही आणि अंधाराचा फायदा घेऊन त्या दुचाकी स्वार तरुणाने महिलेसोबत अश्लील कृत्य केलं. ते पाहून घाबरलेली तरुणीने तेथून पळ काढला आणि नंतर या तरुणीने रायगड हॉस्पिटल गाठले. यानंतर या घटनेची सविस्तर माहिती तरुणीने नेरळ पोलीसांना दिली. तरुणीच्या या तक्रारीनंतर पोलिसांनीही तक्रार दाखल करून घेतली.
नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी महिला सुरक्षितता यांना महत्व देऊन तत्काळ तांत्रिक माहिती संकलित करण्यास सुरुवात केली.या गुन्ह्याची उकल व्हावी यासाठी महिला पोलीस उप निरीक्षक प्राची पागे यांच्या पथकाकडे पुढील तपास दिला. कर्जत कल्याण मार्गावर कर्जत, डिकसल, पेट्रोल पंप,हुतात्मा चौक,पोलिस ठाणे नेरळ, शेलू येथिल सीएसटीव्ही कॅमेरे यांचे फुटेज तपासले.त्यानुसार दुचाकी वरील नंबर वरून गाडीचा मूळ मालक याचा शोध घेतला.त्या माहितीच्या आधारे घटना घडल्यावर दीड तासांनी नेरळ पोलीस बदलापूर येथे त्या तरुणीला अश्लील हावभाव करून पळून गेलेल्या तरुणाच्या घरी बदलापूर येथील सोनिवली गावात पोहचले.तेथे राहणारा विजय चंद्रकुमार तेलगर या 34 वर्षीय तरुणाला मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास पोलीसांनी दुचाकीसह ताब्यात घेतले.
नेरळ पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यावर अवघ्या काही तासात गुन्ह्याची उकल केली असून महिला सुरक्षितता यांना विशेष महत्व देत या गुन्ह्याची उकल करण्यात पुढाकार घेतला.सदर गुन्ह्यात विजय तेलगर याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 79 प्रमाणे कारवाई करण्यात आले आहे.नेरळ पोलिसांनी अवघ्या काही तासात महिलेची छेड काढण्याचा करणाऱ्या तरुणाला अटक केल्याने समाजात कौतुक होत आहे.