File Photo : Matheran
माथेरान : मध्य नेरळ-माधवरान कॉरिडोर पुढील महिन्यात सुरु होणार आहे. पावसाळ्याच्या महिन्यात माथेरान राणी अर्थात टॉय ट्रेनचा एक मार्ग बंद केला जातो. पावसाळ्यात डोंगरावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे टॉय ट्रेन बंद ठेवली जाते. मात्र, यावर मध्य रेल्वेने तोडगा काढला आहे.
हेदेखील वाचा : आधी देवेंद्र फडणवीसनंतर छगन भुजबळ…आता नवा नेता; मनोज जरांगेंच्या निशाण्यावर कोण?
मध्य रेल्वेकडून आता पाणी वाहणाऱ्या मार्गावर बांध घालण्यात येणार आहे. तसेच रुळावरील माती देखील साफ करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यानंतर टॉय ट्रेनची सेवा 15 ऑक्टोबरनंतर सुरू होणार आहे. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, नेरळ-माथेरान मार्गावर पाणी वाहणाऱ्या मार्गावर बांध घालण्यात येत आहेत. पावसाळ्यात रुळावर जमा झालेले दगडही हटवण्यात येणार आहे. रुळावरील दगडामुळे टॉय ट्रेनचे नुकसान होते.
मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, माथेरानच्या डोंगरातून तळापर्यंत पाण्याचा प्रवाह सुरळीत होण्यासाठी चॅनेल बसवण्यात येणार आहे. डोंगरावरील पाण्याचा प्रवाहाला योग्य मार्ग दिल्यास टॉय ट्रेनची सेवा पावसाळ्यातही सुरू राहणार आहे.
5 कोटींचा खर्च लागणार
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कामसाठी 5 कोटींचा खर्च लागणार आहे. मध्य रेल्वेकडून संपूर्ण काम होण्यासाठी 12 महिने लागणार आहे. तर कंत्राटदारांसाठी निविदा जारी केली जाणार आहे. रुळावरील माती बाजूला करण्यासाठी जेसीबी मशीनचा वापर केला जाणार आहे. मागील वर्षांत देखील मध्य रेल्वेने माथेरानच्या ट्रेनसाठी विविध काम केले आहेत. दरम्यान, मध्य रेल्वेने 8 जून ते 15 ऑक्टोबरपर्यंत नेरळ-अमन लॉजपर्यंतची सेवा रद्द केली होती.
हेदेखील वाचा : मृत्यूंनंतर कोणता अवयव किती वेळ जिवंत असतो? शरीरात नक्की कोणते बदल होत असतात? जाणून घ्या






