कर्जत/ संतोष पेरणे : कर्जत शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदी परिसराची दहिवली भागातील स्वच्छता सालाबादप्रमाणे करण्यात आली. दहिवली परिसर विचारमंच यांच्या माध्यमातून आज ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली,त्यात तब्बल एक ट्रॅक्टर आणि ९३५ किलो कचरा संकलित करण्यात आला.दहिवली गाव परिसर विचारमंच आणि कर्जत नगरपालिका प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने उल्हास नदी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
दहिवली ग्रामस्थ आणि विचारमंच समुहाचे सुनिल जाधव,शशांक शेट्टी, प्रविण गांगल,विकास चित्ते, दिनेश कडू,अशोक घोंगे पाटील, अशोक पवार,मिलिंद चिखलकर,स्वाती कदम शिंदे , लता कुलकर्णी ,शामकांत कदम , भरत बामणे,दिपंकार सालये, गणेश कनोजे,भाऊ खानविलकर,दामोदर उर्फ आप्पा कारुळकर,सखाराम सोनवणे, राहुल गायकवाड, नितीन शिंदे, जयप्रकाश जाधव,संजय चंदने तसेच कर्जत शहरातील महेंद्र उर्फ भाऊ कर्वे यांनी नदी स्वच्छता अभियानात सहभाग घेतला.नगरपालिका प्रशासनाचे वतीने कार्यालयीन अधीक्षक रविंद्र लाड,स्वच्छता निरीक्षक रुपेश भोईर,सुनिल लाड,भासे , पर्यवेक्षक हे उपस्थित होते.तर पालिकेचे स्वच्छता मुकादम निकेश मारुती फाळे तसेच सफाई कामगार परेश गरुडे, अमोल जाधव,आकाश परदेशी,प्रज्वल सोनावणे,तेजस सोनावणे,श्रीकांत वाघेला , केतन गायकवाड,रवी सरावते,अनिल चंदन,रवी गायकवाड ,विश्वदीप रणदिवे, कुमार परदेशी,धिरज चौधरी, अरविंद पादीर यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.
महेंद्र महाडिक आणि ईश्वर वाघेले या तरुणांनी नदीतील दूषित पाण्यात उतरून घाण पाण्यात उतरुन सुकलेली झाडे तसेच ओंडके आणि कचरा गोळा करुन नदी किनारी आणून दिला.या मोहिमेत एकुण एक टॅक्टर आणि ९३५ किलो कचरा नदी मधून बाहेर काढण्यात आला.यामध्ये अतिशय दुर्गंधी सुटलेल्या प्लॅस्टिक पिशव्या , निर्माल्य असलेल्या पिशव्या, वाहून आलेले तसेच अडकलेले मोठे झाड व ओंडके,पाण्याच्या प्लॅस्टिक बाटल्या,काचेच्या बाटल्या,टाकलेली कापडे काढण्यात आली.पुलावरून आणि आजूबाजूने टाकण्यात आलेला कचरा त्यात मुख्यतः प्लास्टिक , जुने सामान ,निर्माल्य याचा समावेश होता. त्यात भर म्हणून वरून वाहून येणारा कचरा , सांडपाणी , मलमूत्र , यामुळे बदललेला पाण्याचा रंग, हे सर्व भयानक दृश्य बघवत नव्हते मागच्या वर्षी पण हीच परिस्थिती होती. त्यावेळी याच महिन्यात अशी मोहीम राबवली होती. यावर्षी तोच कचरा ,तशीच घाण नदीत केली गेली. या घाणीने दुर्गंधी सुटली होती.ती सर्व कचरा उचलण्यात आला.
प्रशासनाचे वतीने रविंद्र लाड व विचारमंचाचे वतीने विकास चित्ते,शशांक शेट्टी आणि सुनिल जाधव यांनी खालील आवाहन केले.
१)नदीत कोणत्याही प्रकारचा कचरा टाकू नये.
२) प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर टाळावा.
३) गाव परिसर व नदी परिसर स्वच्छ ठेवावा.
४) प्रशासनाला सहकार्य करावे.