Grapes Benefits: आंबट गोड द्राक्ष खाताना घ्या 'या' गोष्टींची काळजी, जाणून घ्या कधी आणि किती प्रमाणात करावे द्राक्षांचे सेवन
द्राक्ष खाण्याचे फायदे?
द्राक्ष कधी खावी?
दिवसभरात किती प्रमाणात द्राक्ष खावी?
आंबटगोड चवीची द्राक्ष खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणावर द्राक्ष उपलब्ध होतात. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने द्राक्ष खातात. यामध्ये असलेले पोषक घटक शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहेत. द्राक्ष केवळ चवीलाच नाहीतर शरीरासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहेत. यामध्ये विटामिन सी, ए यांसारखे असंख्य विटामिन आढळून येतात. शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी वाटीभर द्राक्षांचे सेवन करावे. यामध्ये असलेला नैसर्ग क गोडवा रक्तातील साखरेची पातळी संतुलित करण्यास मदत करतो. हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी बऱ्याचदा वेगवेगळ्या फळांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. आज आम्ही तुम्हाला द्राक्ष खाताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? द्राक्ष कधी आणि किती प्रमाणात खावीत? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)
शरीरात वाढलेला उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी द्राक्षांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. हृद्यासंबंधित कोणत्याही गंभीर समस्या उद्भवू नये म्हणून द्राक्ष खावीत. अपचन, पोटात वाढलेला गॅस आणि पचनाच्या इतर सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी द्राक्ष खावीत. पण अतिप्रमाणात द्राक्षांचे सेवन केल्यास शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे सहज पचन होतील एवढ्याच प्रमाणात द्राक्ष खावी. दिवसभरात खूप जास्त द्राक्ष खाल्ल्यास शरीरावर नकारत्मक परिणाम होतात.
कोणत्याही फळाचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे. खूप जास्त प्रमाणात फळे खाल्ल्यास रक्तातील साखर झपाट्याने वाढते. द्राक्ष कायमच एक किंवा दीड वाटी एवढीच खावीत. त्यापेक्षा जास्त द्राक्षांचे सेवन करू नये. यामुळे शरीराला हानी पोहचू शकते. जास्त प्रमाणात द्राक्ष खाल्ल्यास आरोग्य बिघडू शकते. आयुर्वेदानुसार पित्त प्रकृतीच्या लोकांनी आंबट फळांचे सेवन करू नये. द्राक्ष कायमच स्वच्छ धुवून खावीत. न धुवता द्राक्षांचे सेवन करू नये. पालक, काकडी, केळी पुदिन्यासोबत स्मूदी बनवून प्यायल्यास पोट सुद्धा भरलेले राहील आणि लवकर भूक लागणार नाही.
स्वच्छ धुवून घेतलेली द्राक्ष नुसतीच किंवा स्मूदी, ज्यूस बनवून सुद्धा पिऊ शकता. द्राक्ष कायमच दुपारच्या वेळेत किंवा मध्यल्या वेळी भूक लागल्यानंतर खावीत. यामुळे पचनाच्या समस्या उद्भवत नाहीत. गॅस, आंबट ढेकर आणि पचनासंबंधी समस्या उद्भवणाऱ्या लोकांनी कधीही उपाशी पोटी द्राक्ष खाऊ नये. रात्री झोपण्याआधी द्राक्ष खाणे टाळावे. रात्री द्राक्ष खाल्ल्यास ती लवकर पचन होत नाही.






