Raigad ZP employee benefit: एसबीआयने रायगड जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी खुल्या केल्या विशेष फायदे (फोटो-सोशल मिडिया)
Raigad ZP employee benefit: स्टेट बैंक ऑफ इंडिया (एसबीआय) ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. या बँकेकडून रायगड जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष सुविधा पुरविल्या जाणार आहेत. यासाठीचा करार सोमवारी रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यामुळे रा.जि.प.च्या कर्मचाऱ्यांना विविध सुविधा उपलब्ध होणार आहेत. एसबीआय बँकेतर्फे राज्य शासन वेतन खाते योजनेतून रायगड जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना विशेष लाभ देण्यात येणार आहे. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पगार खाते शुन्य शिल्लक ठेवून उघडले जाते.
या कराराच्या वेळी राजिप वित्त विभागाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर पठारे, एसबीआयचे रिजनल मैनेजर विलास शिंदे, एजीएम रणजीत मिश्रा, एजीएम देवेंद्र यादव, चिफ मॅनेजर प्रकाश तांबे, अलिबाग शाखेचे चिफ मैनेजर प्रकाश सुमित म्हात्रे, चिफ मॅनेजर धिरेंद्र कुमार, डिस्ट्रीक्ट को-ऑर्डीनेटर रायगड संजय गोळे यांच्यासह रा.जि.प. व बँकेचे इतर कर्मचारी उपस्थित होते.
खातेधारकांना वैयक्तिक अपघात विमा
खातेधारकांना मोफत वैयक्तिक अपघात विमा मिळतो. ज्यामध्ये १ कोटी १० लाख रुपयापासून कमाल २ कोटी ६० लाखांपर्यंत विमा संरक्षण उपलब्ध आहे. तसेच यात मोफत हवाई अपघात विम्याचा लाभदेखील दिला जातो. कायमस्वरूपी अंशतः अंपगत्व आल्यास अपगाव टक्केवारीनुसार ८० लाखापर्यंत व कायमस्वरूपी पूर्ण अयगत्व आल्यास १ कोटी, त्याचप्रमाणे सवलतीच्या दरात आरोग्य विमा ५५ लाखापर्यंत मिळतो. यामध्ये पगार खातेधारकासह जोडीदार, दोन अपत्याचा समावेश आहे.
एसबीआय पगार खात्याचे अतिरिक्त विशेष फायदे






